केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी नवीन घोषणा केली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. तसेच या भरती अंतर्गत भरती होणाऱ्या सैनिकांना अग्नवीर असे नाव देण्यात येणार असून येत्या ऑगस्टपासून ही भरती होण्याची शक्यता आहे.
मात्र, अग्निपथ योजनेवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. नवी लष्करी भरती हा लष्कराच्या अभिमानाशी खेळ अशी भूमिका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतली आहे.
‘भारताला सध्या दोन आघाड्यांवर आव्हान असताना अग्निपथ योजना सशस्त्र दलांची कार्यक्षणता कमी करू शकते. त्यामुळे या सरकारने लष्कराचा अभिमान आणि परंपरेशी खेळणे थांबवावे,’ असे ट्विट राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.
When India faces threats on two fronts, the uncalled for Agnipath scheme reduces the operational effectiveness of our armed forces. The BJP govt must stop compromising the dignity, traditions, valour & discipline of our forces. — Rahul Gandhi (@RahulGandhi) June 15, 2022