छत्रपती संभाजीनगर : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू आहे. आचारसंहितेचा भाग म्हणून दररोज ठिकाणी तपासणी होत आहे. या तपासणीत छत्रपती संभाजीनगर – जळगाव मार्गावर गुरुवारी संध्याकाळी सिल्लोड फाट्याजवळ १९ कोटी रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने जप्त करण्यात आले. जळगावच्या दिशेने जात असलेल्या वाहनात १९ कोटी रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने सापडले. दागिने जीएसटी विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहेत. दागिन्यांच्या व्यवहाराची माहिती घेण्यासाठी संबंधितांना बोलावण्यात आले आहे. कादपत्रांची पडताळणी केल्यानंतर पुढील कारवाईबाबतचे निर्णय घेतले जातील.