‘सशक्त भारत तयार करण्यामध्ये केंद्र सरकारचे महत्त्वाचे योगदान’ – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अर्थसंक्लपीय अधिवेशनाला सुरूवात झाली. ‘सशक्त भारत तयार करण्यामध्ये केंद्र सरकारचे महत्त्वाचे योगदान’ असे मत, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, यंदाचे कोरोनाचे तिसरे वर्ष आहे. कोरोना काळात लसीकरणावर देशाने भर दिला असून देशात ९० टक्क्यांहून अधिक नागरिकांनी कोरोना […]

‘सशक्त भारत तयार करण्यामध्ये केंद्र सरकारचे महत्त्वाचे योगदान’ – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अर्थसंक्लपीय अधिवेशनाला सुरूवात झाली. ‘सशक्त भारत तयार करण्यामध्ये केंद्र सरकारचे महत्त्वाचे योगदान’ असे मत, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, यंदाचे कोरोनाचे तिसरे वर्ष आहे. कोरोना काळात लसीकरणावर देशाने भर दिला असून देशात ९० टक्क्यांहून अधिक नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ७० टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. त्यामुळे लसीकरणामध्ये भारत जगात अव्वल आहे.

राष्ट्रपतींनी सर्व कोरोना योद्धांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, कोरोना काळात अनेकांनी आप्तस्वकीयांना गमावले आहे. याप्रती त्यांनी दु:ख व्यक्त केले. तसेच या काळात भारताने आपले सामर्थ्य दाखवले असल्याचे राष्ट्रपती म्हणाले.

‘आयुष्मान भारत’ आरोग्य अभियान या योजनेचा देशवासीयांना फायदा झाला असून भारताच्या कोरोना लसींना आता जगभरात मान्यात मिळाली असल्याचे, राष्ट्रपतींनी सांगितले. तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी महिलांची भूमिका महत्त्वाची असून महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचे प्रयत्न झाले तर उज्वल योजना, मुद्रा योजनेतून महिला उद्योजकतेला वाव मिळाली असल्याचे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, रब्बी हंगामात केंद्र सरकारने केलेल्या धान्य खरेदीमुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला असून देशाच्या कृषी निर्यातीत वाढ झाली आहे. तसेच पंतप्रधान आवास योजनेइंतर्गत २ कोटी नागरिकांना घरे वितरित करण्यात आले असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. कोरोना काळात गरजूंना बँकिंग प्रणालीशी जोडल्यामुळे शेकडो लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास मदत झाली असल्याचे ते म्हणाले.

तसेच, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत केंद्र सरकार सर्व गरजूंना दर महिन्याला मोफत रेशन पुरवत असते तर सरकारने जे.ए.एम. ट्रिनिटीला नागरिक सशक्तीकरणासोबत जोडले आहे. तसेच पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या माध्यमातून ११ कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना १ लाख ८० हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.

केंद्र सरकारने तिहेरी तलाकला कायदेशीर गुन्हा घोषित केले असून मुस्लिम महिलांनी केवळ मेहरामसोबत हज करण्याची मर्यादाही हटवण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयामुळे विविध पोलीस दलात महिला पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number