आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होणार असून राष्ट्रपती दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२१-२२ वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करतील. तसेच उद्या २०२२-२३ वर्षाचा अर्थसंकल्पीय सादर करतील. या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देशाच्या आर्थिक स्थितीसोबत सामाजिक धोरणे आणि देशाची भविष्यकालीन […]

आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होणार असून राष्ट्रपती दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२१-२२ वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करतील. तसेच उद्या २०२२-२३ वर्षाचा अर्थसंकल्पीय सादर करतील. या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देशाच्या आर्थिक स्थितीसोबत सामाजिक धोरणे आणि देशाची भविष्यकालीन दिशा ठरवली जाईल. त्यामुळे २०२२-२३ वर्षाच्या अर्थसंकल्प नागरिकांना दिलासादायक ठरते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आर्थिक सर्वेक्षण अहवाल म्हणजे काय?

आर्थिक सर्वेक्षण अहवाल म्हणजे, गेल्या एक वर्षातील आर्थिक गोष्टींचा लेखी तपशील. तसेच आर्थिक सर्वेक्षणात देशाच्या जीडीपीचा अंदाज ठरवला जातो. वर्षाच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, देशाच्या भविष्यासाठी सूचना दिल्या जातात. मुख्य आर्थिक सल्लागारांच्या नेतृत्वात आर्थिक सर्वेक्षण अहवाल तयार केला जात असून अर्थसंकल्पापूर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये हा आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number