Brij Bhushan Sharan Singh : महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळप्रकरणात बृजभूषण शरण सिंग यांना दिलासा; आरोपातून निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली : दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने सोमवारी भाजपचे माजी खासदार आणि ‘रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया’चे (WFI) माजी प्रमुख बृजभूषण शरण सिंग तसेच सह-आरोपी विनोद तोमर यांची महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या कथित लैंगिक छळाच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. “ज्या दिवशी माझ्यावर आरोप करण्यात आले होते, तेव्हाच मी म्हणालो होतो की जर आरोप सिद्ध झाले तर मी स्वतःहून […]

Brij Bhushan Sharan Singh : महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळप्रकरणात बृजभूषण शरण सिंग यांना दिलासा; आरोपातून निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली : दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने सोमवारी भाजपचे माजी खासदार आणि ‘रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया’चे (WFI) माजी प्रमुख बृजभूषण शरण सिंग तसेच सह-आरोपी विनोद तोमर यांची महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या कथित लैंगिक छळाच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. “ज्या दिवशी माझ्यावर आरोप करण्यात आले होते, तेव्हाच मी म्हणालो होतो की जर आरोप सिद्ध झाले तर मी स्वतःहून फाशी घेईन, आज न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केली आहे आणि ‘सन्मानपूर्वक मुक्तता’ असा शब्दप्रयोग केला आहे. जे झाले ते झाले,” अशी प्रतिक्रिया 69 वर्षीय भाजप नेत्याने निर्दोष मुक्ततेनंतर माध्यमांशी बोलताना दिली.

हेही वाचा : Bomb In Peace Rally : भयंकर! तरुणाने स्वतःलाच बॉम्बने उडवले; स्फोटात 8 पोलिसांसह 19 जण ठार, 22 गंभीर जखमी

हे प्रकरण दिल्ली पोलिसांनी नोंदवलेल्या एका एफआयआरशी (FIR) संबंधित आहे. महिला कुस्तीपटूंनी जंतरमंतर येथे केलेल्या आंदोलनानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आंदोलनादरम्यान, ‘रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया’चे (WFI) प्रमुख असताना सिंग यांनी लैंगिक छळ केल्याचे आरोप करण्यात आले होते. यापूर्वी, आरोपांची चौकशी पूर्ण केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी 15 जून 2023 रोजी 1500 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. ‘रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया’चे प्रमुख असताना केलेल्या लैंगिक छळाबाबत सिंग यांच्यावर आरोप करणाऱ्या देशांतर्गत आणि परदेशातील महिला कुस्तीपटूंच्या तक्रारींच्या अनुषंगाने आरोपींवर खटला चालवला जात आहे.

विरोधीपक्षांकडून होणारी टीका आणि जनमानसावर होणारा परिणाम लक्षात घेता, 2024 च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी ब्रृजभूषण सिंग यांना पक्षाचे तिकीट नाकारण्यात आले. त्याऐवजी भाजपने त्यांचे पुत्र करण भूषण सिंग यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी ही जागा जिंकली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number