भाजपाचे काँग्रेस विरोधात आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत बुधवारी पंजाबमध्ये अक्षम्य चूक झाल्याविरोधात भाजप युवा मोर्चाकडून बडकस चौकातील राम मंदिरात पूजा करत काँग्रेसच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी काँग्रेसने जाणीवपूर्वक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत हेळसांड केला असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. पंजाब दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला. या घटनेमुळे विरोधकांनी पंजाबचे मुख्यमंत्री […]

भाजपाचे काँग्रेस विरोधात आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत बुधवारी पंजाबमध्ये अक्षम्य चूक झाल्याविरोधात भाजप युवा मोर्चाकडून बडकस चौकातील राम मंदिरात पूजा करत काँग्रेसच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी काँग्रेसने जाणीवपूर्वक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत हेळसांड केला असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला.

पंजाब दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला. या घटनेमुळे विरोधकांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी आणि काँग्रेसविरोधात टीका केली आहे. दरम्यान भाजप युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात आले. तसेच काँग्रेसला सुबुध्दी देण्यासाठी भाजपच्या युवा मोर्च्याकडून बडकस चौकातील राम मंदिरात पूजा अर्चना करण्यात आली आणि संतप्त कार्यकर्त्यांनी पंजाब सरकार आणि काँग्रेस विरोधात नारेबाजी करत काँग्रेसचा पुतळादेखील दहन केला.

पंजाब दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत झालेल्या गोंधळाप्रकरणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. दरम्यान पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाल्याप्रकरणी माहिती घेऊन या घटनेवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number