विधान परिषदेच्या दोन्ही जागांवर भाजपा वरचढ?

राज्यातील विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी मतदान पार पडत आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या सहा जागांपैकी चार जागांवर बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत तर नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक होत आहे. नागपूर, अकोल्यात विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून नागपुरात वैभव देशमुख आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात लढत […]

विधान परिषदेच्या दोन्ही जागांवर भाजपा वरचढ?

राज्यातील विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी मतदान पार पडत आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या सहा जागांपैकी चार जागांवर बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत तर नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक होत आहे.

नागपूर, अकोल्यात विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून नागपुरात वैभव देशमुख आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात लढत रंगली आहे तर अकोल्यात गोपिकिशन बाजोरिया आणि वसंत खंडेलवाल यांच्यात लढत पाहण्यास मिळणार आहे. नागपूरमध्ये ५५४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून अकोल-वाशीम येथे ८२२ पैकी ८०८ मतदारांनी मतदान केले आहे.

विधानपरिषद निवडणुकीत भाजप-काँग्रेसमध्ये साटंलोटं

कोल्हापूर, धुळे आणि मुंबईत बिनविरोध निवड झाली असून कोल्हापूरमध्ये राज्यमंत्री सतेज पाटील विजयी झाले आहेत तर भाजपचे अमल महाडिक यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. धुळ्यात भाजपच्या अमरिश पटेल यांची बिनविरोध निवड झाली तर काँग्रेस उमेदवारांनी माघार घेतली. मुंबईत भाजपचे नेते राजहंस सिंह यांचा मार्ग सुकर झाला असून शिवसेनेचे सुनील शिंदे यांचीही निवड निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे. तर मुंबईत काँग्रेसने विधान परिषदे निवडणुकीमध्ये उमेदवार दिला नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number