हल्लीच्या चोरांचा खरंच काही नेम नाही! कशाची चोरी केली.. केसांची.. तेही तब्बल एक कोटींच्या? विश्वासच बसत नाही

कोट्यवधींचे दागिने, महागड्या वस्तू चोरीला जातात, हे आपण ऐकलेले असते. मात्र, केस चोरीला गेल्याच्या बातमीवर कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण ही घटना खरोखरच घडली आहे.<br/>

हल्लीच्या चोरांचा खरंच काही नेम नाही! कशाची चोरी केली.. केसांची.. तेही तब्बल एक कोटींच्या? विश्वासच बसत नाही

Hair Heist: पैशांची, मूल्यवान वस्तूंची चोरी होते, अशा अनेक बातम्या आपल्या कानावर येत असतात. पण केस चोरीला जाऊ शकतात, याची कुणी कल्पनाही केली नसेल. पण बंगळुरूमध्ये चक्क केसांची चोरी झाली आहे. आता हे ऐकून अनेकांना वेडेपणा वाटेल.. पण ही चोरी झालीये ती थोड्या-थोडक्या केसांची नव्हे; तर, तब्बल एक कोटी रुपयांच्या..!

केस विंचरल्यानंतर काही केस गळतात. अनेक महिला हे केस साठवून ठेवतात. हे केस खरेदी करणारे काही लोक आपल्या घराजवळ येत असतात. त्यामुळे गळलेल्या केसांची थोडी-फार किंमत मिळते. सर्वसामान्यांना मानवी केसांशी संबंधित अर्थकारणाची एवढीच माहिती असते. मात्र, केसही चोरीला जाऊ शकतात, याची कल्पना कुणी केलेली नसेल. पण अशी चोरी खरंच झाली आहे. बंगळुरूच्या लक्ष्मीपूर येथील गोदामातून चोरांच्या टोळीने 90 लाख ते 1 कोटी रुपयांचे केस चोरले आहेत.

हेही वाचा – 'महिलेने पुरूषावर केलेला प्रत्येक आरोप खराच आहे, असं मानता येणार नाही,' उच्च न्यायालय म्हणाले, 'हल्ली निष्पाप लोकांना अडकवण्याची…'

केस चोरीला जाऊ शकतात?
केसांचे विग बनवण्याच्या उद्योगात आर्थिक उलाढाल मोठी आहे. अशा उद्योगांना मोठ्या प्रमाणात केसांची गरज असते. मात्र, केसांचे वजन किती कमी असते, हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. तेव्हा एक कोटी रुपयांचे केस ठेवण्यासाठी किती जागा लागू शकते, याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. तर, अख्खं गोदाम भरून असलेल्या केसांची चोरी झाली आहे.
हे केस चीन, बर्मा आणि हाँगकाँगला निर्यात केले जाणार होते. मात्र 28 फेब्रुवारी रोजी सहा जणांच्या टोळक्याने गोदामातून केस चोरले. येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीची घटना कैद झाली आहे.

तक्रार दाखल
काही दिवसांपूर्वी चीनमधील खरेदीदारांनी गोदामाला भेट देऊन पाहणी केली होती. चीनमधील विग बनविणाऱ्या कंपनीला केसांची आवश्यकता होती. या दौऱ्यानंतर काही दिवसांनी ही चोरी झाली आहे. गोदामाचे मालक वेंकटरमण यांनी चोरीनंतर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे चोरांचा तपास सुरू केला आहे.

असा आहे संशय
चोरांना गोदामात असलेला साठा आणि त्याची बाजारातील किंमत आधीपासूनच माहीत असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. या चोरीमागे गोदामातीलच एखाद्या कर्मचाऱ्याचा हात आहे की, मानवी केसांचा व्यापार करणाऱ्यांपैकी कुणी टोळीचा वापर करून दरोडा टाकला, याचाही तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा – तीन वर्षांच्या पीडित मुलीबाबत जिल्हाधिकाऱ्याचं धक्कादायक वक्तव्य; म्हणे, 'तिनेच आरोपीला लैंगिक शोषण करायला प्रवृत्त केलं असेल!'

आधी एका घटनेत कॅश मॅनेजमेंट कंपनीतील प्रमुख अधिकारीच निघाले होते चोर
मागच्या महिन्यात बंगळुरू पोलिसांनी एटीएममधून रोकड चोरणाऱ्या सहा आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. लकी भास्कर या चित्रपटापासून प्रेरणा घेत, या टोळक्याने ही चोरी केली होती. कॅश मॅनेजमेंट कंपनी सिक्योर व्हॅल्यू प्रा. लि. चे कर्मचारी एटीएम मशीनमध्ये भरण्यासाठी आणलेले पैसे चोरताना आढळले होते. महालक्ष्मी लेआऊट पोलिसांनी टोळीला जेरबंद केले आणि 52 लाखांची रोकड हस्तगत केली. टोळीतील चोर हे कॅश मॅनेजमेंट कंपनीतील प्रमुख अधिकारी आणि एटीएम मशीनची देखभाल करणारे कर्मचारी होते. ही टोळी एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेली रोकड लंपास करत होती.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number