बेलापूर जेट्टी ते गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सीचं उद्घाटन करण्यात आलं आहे. मंगळवार, ७ फेब्रुवारीपासून दक्षिण मुंबईतील बेलापूर जेटी ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाली आहे. नवी मुंबईकरांना आनंदाची बातमी आहे. वॉटर टॅक्सी सेवेमुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी होईल. दक्षिण मुंबईहून बेलापूरला अवघ्या ६ ‘नयन इलेव्हन’ या वॉटर टॅक्सीमध्ये खालच्या डेकवर १४० प्रवासी आणि वरच्या किंवा बिझनेस क्लासच्या डेकवर अतिरिक्त ६० प्रवासी बसू शकतात.
वॉटर टॅक्सीच्या वेळा जहाज बेलापूरहून सकाळी ८.३० वाजता निघेल आणि ९.३० वाजता गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचेल. त्यानंतर वॉटर टॅक्सी संध्याकाळी ६.३० वाजता नवी मुंबईसाठी निघेल आणि संध्याकाळी ७.३० वाजता बेलापूर जेट्टीवर पोहोचेल.’वॉटर टॅक्सीची तिकीट खालच्या डेकसाठी २५० रुपये आणि वरच्या किंवा बिझनेस क्लास डेकसाठी 350 रुपये किंमत असेल.
या सेवेमुळे बेलापूरहून दक्षिण मुंबईत अवघ्या 60 मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. नवी मुंबईतून चालणाऱ्या वॉटर टॅक्सी शहराला मुंबई, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, एलिफंटा लेणी आणि रेवस यांना जोडतील. या सर्व सेवा टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केल्या जातील.