ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज भारत दौऱ्यावर

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान अल्बानीज बुधवारी संध्याकाळी गुजरातच्या अहमदाबादमध्ये दाखल झाले. त्यांनी महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी साबरमती आश्रमाला भेट दिली. याचे फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी यांचे भारतात जंगी स्वागत करण्यात आले. त्यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत लिहिले की ‘अहमदाबाद येथे एक अविश्वसनीय स्वागत करण्यात […]

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज भारत दौऱ्यावर

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान अल्बानीज बुधवारी संध्याकाळी गुजरातच्या अहमदाबादमध्ये दाखल झाले. त्यांनी महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी साबरमती आश्रमाला भेट दिली. याचे फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी यांचे भारतात जंगी स्वागत करण्यात आले. त्यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत लिहिले की ‘अहमदाबाद येथे एक अविश्वसनीय स्वागत करण्यात आले. ऑस्ट्रेलिया-भारत संबंधांसाठी एक महत्त्वपूर्ण सहलीची सुरुवात झाली आहे,’

गुजरातमधील एका कार्यक्रमात त्यांनी एक भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली की ऑस्ट्रेलियाचे डीकिन युनिव्हर्सिटी गुजरातमधील गांधीनगर येथील गिफ्ट सिटी येथे आपली शाखा स्थापन करणार आहे. ऑस्ट्रेलिया-भारत शिक्षा योग्यता मान्यता तंत्र’ याला मान्यता दिली आहे.’ असे पंतप्रधान अँथनी अल्बानीज म्हणाले.

अल्बानीज यांनी अहमदाबाद येथे होळीचा आनंद लुटला. अल्बानीज यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेतली. अल्बानीज होळीच्या निमित्ताने गांधीनगर येथील राजभवनात गुजरात सरकारने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि इतर मान्यवर सहभागी झाले.

नंतर पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांनी मिळून अहमदाबादमधील मोटेराच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी हजेरी लावली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान राजनैतिक संबंधांना ‘क्रिकेट डिप्लोमसी’च्या माध्यमांतून मोदी सरकार पाहत असल्याचे दिसून येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी गुरुवारी सकाळी अहमदाबादमधील मोटेरा येथिल नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी क्रिकेटचा आनंद घेतला. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान अल्बानीज यांनी खेळाडूंची भेट घेतली. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान अल्बानीज आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील ही चौथी भेट आहे. नंतर अल्बानीज मुंबईला रवाना झाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number