Nagpur News : वारंवार समजावलं, ओरडून थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने कोणाचही ऐकलं नाही; मालगाडीवर उडी घेतली अन् काही सेकंदांत घडला थरार

नागपूरमधून मंगळवारी भल्या पहाटे काळजाचा थरकाप उडवणार घटना समोर आली आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर एक व्यक्ती मालगाडीवर चढला आणि ओव्हर हेड वायर पकडण्याचा प्रयत्न करू लागला.

Nagpur News : वारंवार समजावलं, ओरडून थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने कोणाचही ऐकलं नाही; मालगाडीवर उडी घेतली अन् काही सेकंदांत घडला थरार

नागपूरमधून मंगळवारी भल्या पहाटे काळजाचा थरकाप उडवणार घटना समोर आली आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर एक व्यक्ती मालगाडीवर चढला आणि ओव्हर हेड वायर पकडण्याचा प्रयत्न करू लागला. दरम्यान, तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला. असे असूनही, या युवकाने अत्यंत वेगाने उडी मारून समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या मालगाडीवर झेप घेतली आणि तेथील विजेची वायर पकडली. या वायरमध्ये विद्युत प्रवाह सुरू असल्याने तो गंभीररित्या होरपळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा- Cryptocurrency Scam: 'हॅलो… मी दिव्या बोलतेय!' व्हॉट्सॲपवरील एका मेसेजने 70 वर्षीय CA ला लुटलं; 21 कोटींना लावला चुना

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर रेल्वे स्थानकावरील यार्डमध्ये उभी असलेल्या मालगाडीवर एक तरुण चढला आणि ही बाब रेल्वे कर्मचाऱ्यांना कळताच तात्काळ त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच परिस्थितीचे गांभीर्य जाणून घेत कोणतीही मोठी दुर्घटना होण्यापूर्वी आणि त्या तरुणाच्या जीवाला धोका पोहचण्यापूर्वीच संबंधित मार्गावरील वीजपुरवठा तात्काळ बंद करण्यात आला.

तर दुसरीकडे रेल्वे कर्मचारी आणि सुरक्षा यंत्रणा त्या तरुणाला खाली उतरवण्याचा आणि त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्याने कोणाचेही न ऐकता अचानक पहिल्या मालगाडीवरून उडी मारून बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या मालगाडीवर उडी घेत तेथील वायर पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मार्गावरील ओव्हर हेड वायरचा पुरवठा सुरू होता. ज्यामुळे दुर्दैवाने तरुणाचा हात हाय व्होल्टेज वायरला लागला आणि विजेच्या जोरदार धक्क्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे सुरक्षा दल आणि जीआरपीच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या व्यक्तीची ओळख पटवण्याचे कार्य सुरू असून रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत. तसेच मालगाडीवर चढण्यामागील त्याचा नेमका हेतू काय होता, तसेच ही घटना अपघात होती की त्यामागे इतर काही कारण होते, याचा तपास जीआरपी आणि आरपीएफकडून केला जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number