पल्लेकेले, २ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत शनिवार २ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान समोरासमोर असतील. या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमध्ये आशिया चषकाच्या निमित्ताने एकदिवसीय सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजल्यापासून या सामन्याचे थेट प्रक्षेपण सुरू होणार आहे. हा सामना श्रीलंकेतील पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. पावसामुळे सामना झाला नाही तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाणार आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये तब्बल चार वर्षांनी भारत आणि पाकिस्तान समोरासमोर येणार आहेत. यामुळे शनिवारच्या सामन्याचे महत्त्व वाढले आहे.
नाणेफेक जिंकत भारताचा फलंदाजीचा निर्णय
भारत – पाकिस्तान सामन्यासाठी नाणेफेक झाली. नाणेफेक जिंकत भारताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार) , शुभमन गिल , इशान किशन (यष्टीरक्षक) , विराट कोहली , श्रेयस अय्यर , हार्दिक पांड्या , रवींद्र जडेजा , शार्दुल ठाकूर , कुलदीप यादव , जसप्रीत बुमराह , मोहम्मद सिराज
पाकिस्तान : फखर जमान , इमाम-उल-हक , बाबर आझम (कर्णधार) , मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक) , आगा सलमान , इफ्तिखार अहमद , शादाब खान , मोहम्मद नवाज , शाहीन आफ्रिदी , नसीम शाह , हरिस रौफ
प्रश्न : कुठे बघाल भारत – पाकिस्तान सामना ?
उत्तर : भारत – पाकिस्तान सामना डिस्ने प्लस हॉटस्टार या मोबाईल अॅपवर आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनलवर बघता येईल
प्रश्न : किती वाजता सुरू होणार भारत – पाकिस्तान सामना ?
उत्तर : भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजल्यापासून भारत – पाकिस्तान सामना सुरू होणार
प्रश्न : कुठे होणार भारत – पाकिस्तान सामना ?
उत्तर : श्रीलंकेतील पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार भारत – पाकिस्तान सामना