IPL 2026: मैदानावर पंचांशी हुज्जत घालणं पडलं महागात; टिम डेव्हिडला दंड, तर हार्दिक पांड्यावरही करण्यात आली ‘ही’ कारवाई

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना खेळाडूंच्या शिस्तभंगाच्या कारवाईमुळे चर्चेत आला आहे.

IPL 2026: मैदानावर पंचांशी हुज्जत घालणं पडलं महागात; टिम डेव्हिडला दंड, तर हार्दिक पांड्यावरही करण्यात आली ‘ही’ कारवाई

IPL 2026: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 2026 हंगामातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना खेळाडूंच्या शिस्तभंगाच्या कारवाईमुळे चर्चेत आला आहे. पंचांशी हुज्जत घातल्याप्रकरणी RCB चा फलंदाज टिम डेव्हिड याच्यावर सामना पंचांनी (Match Referee) कठोर कारवाई केली आहे. याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या यालाही स्लो ओव्हर रेटमुळे दंडाचा फटका बसला आहे.

टिम डेव्हिडला 25 टक्के दंड आणि 'डिमेरिट पॉइंट'
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात आरसीबीच्या डावातील 18 व्या षटकादरम्यान ही घटना घडली. टिम डेव्हिडने चेंडू हातात घेऊन त्याच्या आकाराची तपासणी करण्यास सुरुवात केली होती. पंचांनी त्याला वारंवार चेंडू परत देण्यास सांगितले, मात्र डेव्हिडने त्याकडे दुर्लक्ष करत पंचांशी हुज्जत घातली. आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.4 चे उल्लंघन केल्याचा दोषी आढळल्यामुळे टिम डेव्हिडच्या सामना शुल्कातून 25 टक्के रक्कम दंड म्हणून कापली जाणार आहे. तसेच त्याच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एक 'डिमेरिट पॉइंट' जोडण्यात आला आहे.

कर्णधार हार्दिक पांड्याला 12 लाखांचा दंड
दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या यालाही दंड ठोठावण्यात आला आहे. निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्यामुळे (Slow Over-rate) हार्दिकला आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.22 अंतर्गत दोषी धरण्यात आले. हंगामातील हा पहिलाच गुन्हा असल्याने हार्दिकवर 12 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. पंचांच्या या कडक निर्णयामुळे आयपीएलमध्ये खेळाडूंच्या शिस्तीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा – Rohit Sharma MI IPL 2026 : दुष्काळात तेरावा महिना! आधीच संघाला उतरती कळा लागली असताना मुंबईचं टेन्शन आणखी वाढलं

RCB चा 18 धावांनी विजय
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, आरसीबीच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेत 20 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 240 धावांचा डोंगर उभा केला. 241 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. शेर्फेन रदरफोर्डने 31 चेंडूंत 71 धावांची धडाकेबाज खेळी करत विजय खेचून आणण्याचा प्रयत्न केला, मात्र मुंबईचा संघ 5 गड्यांच्या मोबदल्यात 222 धावांपर्यंतच पोहोचू शकला. परिणामी, आरसीबीने 18 धावांनी रोमहर्षक विजय नोंदवला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number