Crime News : जामिनावर बाहेर येताच मोठं हत्याकांड, बायको-मुलांसह 6 जणांची हत्या; क्रूरकर्माने पोलिसांनाही घाम फोडला

तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पॉक्सो प्रकरणात जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने स्वतःच्या कुटुंबियांसह सहा जणांची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आलीय.

Crime News : जामिनावर बाहेर येताच मोठं हत्याकांड, बायको-मुलांसह 6 जणांची हत्या; क्रूरकर्माने पोलिसांनाही घाम फोडला

तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पॉक्सो प्रकरणात जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने स्वतःच्या कुटुंबियांसह सहा जणांची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, एका पोस्को गुन्हातील आरोपी राजकुमारविरुद्ध एका 17 वर्षांच्या मुलीने 16 मे रोजी पॉक्सो कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच त्याची जामिनावर सुटका झाली. यानंतर शुक्रवार रात्री जामिनावर बाहेर आलेल्या आरोपी राजकुमारने एकाचवेळी तब्बल 6 जणांना संपवले. आरोपी राजकुमारने आधी घरी त्याच्या 30 वर्षीय पत्नीची, 4 वर्षांच्या मुलाची आणि 18 महिन्यांच्या मुलाची हत्या केली. यानंतर सुमारे 6 किलोमीटर दूर एका गावात गेल्यानंतर त्याने त्याच्यावर आरोप करणाऱ्या 17 वर्षाच्या मुलीला देखील संपवले, तसेच तिच्या आईची आणि आजीचीही हत्या केली. 

हेही वाचा- POCSO Act Case: मनोरंजन विश्व हादरलं! प्रसिद्ध अभिनेत्याला अटक; 16 वर्षीय मुलीचा छळ केल्याचा आरोप

या घटनेनंतर तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला असून, पिडित मुलीच्या मामाने गंभीर आरोप केला आहे. आरोपीवर गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीने संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्याला चौकशीसाठी किंवा रिमांडसाठी नेण्यात आलं नाही, असं म्हणत पिडित मुलीच्या कुटूंबियांनी धक्कादायक आरोप केले आहेत. दरम्यान या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  या प्रकरणातील सर्व पैलूंचा तपास करून हत्येमागील नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number