असं म्हणतात की आई ही आपल्या बाळासाठी कोणतीही बाजू सोडून स्वतःचा जीवही धोक्यात घालायला तयार असते. मात्र हैदराबादमध्ये स्वतः आईनेच आपल्या दोन महिन्यांच्या निष्पाप लेकराला चुलीत टाकून जिवंत जाळले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मूळचे मध्य प्रदेशचे असणारे राजेंद्र आणि ममता हे हैदराबाद येथे राहत होते. नवरा राजेंद्र एका अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षक आणि कामगार म्हणून काम करत होता. नवरा कामाला गेल्यानंतर ममता आणि तिचं दोन महिन्यांचं बाळ दोघेच घरी होती. यावेळी बाळ सतत रडत असल्यामुळे ममताने संतप्त होत रागाच्या भरात चुलीमध्ये टाकून जिवंत जाळलं.
या घटनेमुळे हैदराबाद हादरले. बाळाचे राजेंद्र सकाळी कामावरून घरी आल्यानंतर ममता आपल्या मुलाला चुलीमध्ये टाकून जाळताना दिसली. त्यानंतर त्यांनी त्वरित पोलिसांना घडलेल्या घडनेची माहिती दिली, पोलिसांना हत्येची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी पहोहोचले.
ममताची विचारपुस करण्यात आल्यानंतर असं समोर आले की, तिने बाळ ओरडू नये यासाठी त्याच्या तोंडात कापड कोबंले होते आणि त्याच्या डोळ्यांवर पट्टी बाधली होती. त्यानंतर तिने बाळाला चुलीत टाकून दिले. वडील राजेंद्र घरी पोहचेपर्यंत बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे. तसेच अर्धवट जळालेल्या अवस्थेतील बाळाचा मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे हैदराबादमध्ये खळबळ उडाली आहे.