Viral Video : तुम्ही खात असलेली काकडी रासायनिक रंगातली! कलिंगड प्रकरणानंतर धक्कादायक एक व्हिडीओ समोर

कलिंगड प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामुळे रस्त्यावर विकली जाणारी फळं खावी की नाही असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होऊ शकतो. 

Viral Video : तुम्ही खात असलेली काकडी रासायनिक रंगातली! कलिंगड प्रकरणानंतर धक्कादायक एक व्हिडीओ समोर

रजधानी मुंबईत गेल्या काही दिवसांपूर्वी कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चार जणांची विषबाधा होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर विक्रेत्यांपासून  ते नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कलिंगड प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामुळे रस्त्यावर विकली जाणारी फळं खावी की नाही असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होऊ शकतो. 

हेही वाचा- Mumbai-Goa Highway Traffic : मुंबई-गोवा महामार्ग की मृत्यूचा महामार्ग? भीषण वाहतूक कोंडीत नागरिकांचा संताप अनावर

बिहारमधील कटिहार जंक्शनवर एका महिलेने खराब झालेल्या आणि पांढऱ्या पडलेल्या काकड्यांना चक्क रासायनिक रंगात बुडवून ताजे दाखवण्याचा संतापजनक प्रकार केला आहे. मुंबईत अलीकडेच कलिंगड खाल्ल्याने झालेल्या विषबाधेच्या घटनेनंतर, आता काकडीच्या या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. यावेळी महिलेने एका डब्यातील गडद हिरव्या रासायनिक रंगात पांढऱ्या पडलेल्या काकड्या बुडवल्या यानंतर काही सेकंदातच त्या काकड्या ताज्या आणि हिरव्या गार दिसू लागल्या. यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number