Dahisar Ganesh Mandal : मध्यरात्री गणपती मंडपातील बाप्पाच्या मूर्तीवर दगडफेक; सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपींची ओळख पटली, एकाला अटक

मुंबई : गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील दहिसर पूर्व येथील एका गणपती मंडपाच्या दिशेने दगडफेक केल्याप्रकरणी एका तरुणाला सोमवारी अटक करण्यात आली आहे. या घटनेचे कथित सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यामुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 21 सप्टेंबर रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास दहिसर पूर्व येथील ‘अमर सेवा मंडळा’च्या ‘ओवरीपाडाचा राजा’ या गणपती मंडपात घडली. या […]

Dahisar Ganesh Mandal : मध्यरात्री गणपती मंडपातील बाप्पाच्या मूर्तीवर दगडफेक; सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपींची ओळख पटली, एकाला अटक

मुंबई : गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील दहिसर पूर्व येथील एका गणपती मंडपाच्या दिशेने दगडफेक केल्याप्रकरणी एका तरुणाला सोमवारी अटक करण्यात आली आहे. या घटनेचे कथित सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यामुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 21 सप्टेंबर रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास दहिसर पूर्व येथील ‘अमर सेवा मंडळा’च्या ‘ओवरीपाडाचा राजा’ या गणपती मंडपात घडली. या घटनेनंतर मंडळाच्या सदस्यांनी त्वरित दहिसर पोलिसांना सूचित केले आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली.

हेही वाचा : Dharashiv Crime : धाराशिव हादरलं! घरगुती वादातून पतीचा पत्नीवर चाकूने हल्ला; रक्ताच्या थारोळ्यात आढळला पत्नीचा मृतदेह

सीसीटीव्हीमध्ये दगडफेकीची घटना कैद

ऑनलाइन फिरत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण मंडपाच्या दिशेने दगडफेक करताना दिसत आहे. तसेच, या फुटेजमध्ये त्या तरुणाच्या जवळ आणखी दोन व्यक्तीही दिसत आहेत. मात्र, त्या व्यक्ती काहीतरी फेकत असल्याचे यात दिसत नाही. उलट तो तरुण जेव्हा मंडपाच्या दिशेने ती वस्तू फेकतो, तेव्हा त्या व्यक्ती तिथून दूर जाताना दिसतात. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्या तरुणाची ओळख पटवून त्याला अटक केल्याचे वृत्त आहे. मात्र, त्याची ओळख अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. पोलीस या घटनेशी संबंधित परिस्थितीचा आणि कथित दगडफेकीमागील हेतूचा तपास करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number