Mumbai Crime : माणुसकीला काळिमा फासणारी घटना! कफ परेडमध्ये मूकबधिर तरुणीवर नराधम पित्याकडून अत्याचार

मुंबईच्या कफ परेड परिसरातून माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मुंबईच्या कफ परेड भागात एका 20 वर्षीय मूकबधिर तरुणीवर तिच्याच नराधम पित्याकडूनच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Mumbai Crime : माणुसकीला काळिमा फासणारी घटना! कफ परेडमध्ये मूकबधिर तरुणीवर नराधम पित्याकडून अत्याचार

मुंबईच्या कफ परेड परिसरातून माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मुंबईच्या कफ परेड भागात एका 20 वर्षीय मूकबधिर तरुणीवर तिच्याच नराधम पित्याकडूनच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सप्टेंबर 2025 मध्ये पिडीतेने पोटदुखीची तक्रार तिच्या आजीकडे केली, वेदना असहाय होत असल्यामुळे पिडीतेला मुंबईतील कामा अँड अल्बलेस रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिथेच तिची तपासणी केली होती.

हेही वाचा- Chhatrapati Sambhajinagar : “तू कोणाला बोलशील तर…”, धमकी देत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार

तपासणी दरम्यान पिडीत तरुणी 5 महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांकडून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता, याचआरोपीच्या शोधात पोलिसांनी 17 संशयितांची डीएनए तपासणी केली. त्यानंतर डीएनए चाचणीत वडिलांशी नमुना जुळल्याने पिडीतेच्या पित्याला अटक करण्यात आली. प्रकरणात पित्यासह आणखी दोन व्यक्तींना अटक करण्यात आली असून यात एक अल्पवायीन तरुणाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

या घटनेने केवळ नात्यांमधील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. समाजात महिलांच्या आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा दावा केला जात असतानाच अशा घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर तसेच सामाजिक मूल्यांवर गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदेशीर अंमलबजावणी, संवेदनशील पोलीस यंत्रणा आणि समाजाची सामूहिक जबाबदारी अधिक ठळकपणे पुढे येण्याची गरज आहे.

https://youtu.be/MqWCb0Sv5j0

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number