Crime News: "तुझी आई होण्याची लायकी ठेवणार नाही" डेटिंग ॲपवरील पार्टनरने 19 वर्षीय तरुणीसोबत ओलांडल्या क्रूरतेच्या सिमा

हरियाणाच्या गुरुग्राममधील बादशाहपूर पोलिस स्टेशन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 19 वर्षीय तरुणीवर तिच्याच लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पार्टनरने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Crime News: &quotतुझी आई होण्याची लायकी ठेवणार नाही&quot डेटिंग ॲपवरील पार्टनरने 19 वर्षीय तरुणीसोबत ओलांडल्या क्रूरतेच्या सिमा

गुरुग्राम: सोशल मीडियाच्या वापरामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत अनेक तरुणमुल डेटिंग ॲप्सवर पार्टनर शोधतात, पण तिथे भेटलेली व्यक्ती विश्वासार्ह आहे की नाही हे देखील तपासणं तितकचं महत्त्वच असतं. काही वेळा ही भेट धोकादायक ठरू शकते, अगदी जीवे धोक्यात आणणारीही. दरम्यान हरियाणाच्या गुरुग्राममधील बादशाहपूर पोलिस स्टेशन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 19 वर्षीय तरुणीवर तिच्याच लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पार्टनरने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

हेही वाचा- Buldhana Chikhla News : संजीवनी वाघ यांचे कपडे कोणी फाडले? चिखला गाव वादातील आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर; Viral Video
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर 2025 मध्ये 19 वर्षीय तरुणीची आरोपीसोबत डेटिंग ॲपवर ओळख झाली. त्यांच्यात हळूहळू संवाद वाढू लागला आणि त्यांच्यातील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनीही लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहण्यचा निर्णय घेतला. आरोपी तरुणाने हळूहळू तरुणीच्या चारित्र्यावर संशय घेतला. याच रागात त्याने तरुणीच्या डोक्यात स्टीलच्या बाटलीने वार केले. भिंत आणि कपाटाला तरुणीचं डोकं आपटलं. तसेच तिच्या पायांवर चाकूने वार केले. इतकचं नव्हे तर त्याने 19 वर्षीय तरुणीचा सॅनिटायजरने प्रायव्हेट पार्ट जाळला आणि 3 दिवस अतोनात टॉर्चर केलं. तिच्या त्या अवस्थेत त्याने तिचा व्हिडिओ काढला आणि ‘कधी आई होशील अशी लायकी तुझी ठेवणार नाही…’ असं म्हणत तिला धमकी दिली. 

हेही वाचा- Pune Crime : पुण्यात भर दुपारी थरार! स्पा सेंटरवर पोलिसांची धाड; पळून जाण्याच्या नादात तरूणीची इमारतीवरून उडी अन् क्षणात मृत्यू तर…
त्यानंतर पीडित तरुणी ही मुळची त्रिपुराची असून BSc बायोटेकचं शिक्षण घेत होती. मुळची त्रिपुराची असल्यामुळे तिने तरुणाच्या फोनवरून आईला फोन केला आणि बंगाली भाषेत घडलेली घटना सांगितली. त्यानंतर तिच्या आईने पोलिसांना घडलेला प्रसंग सांगितला, त्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचले आणि पीडित तरुणीला रेस्कू केलं. दरम्यान पीडित तरुणीने दिलेल्या जबाबानुसार एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की तो लग्नाच्या बहाण्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता, तिला मारहाण करत होता आणि तिच्यावर अत्याचार करत होता. एफआयआरमध्ये बीएनएसच्या कलम 115, 118(1), 118(2), 127(2), 69 आणि 351(2) यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number