विकसित भारताचा संकल्प

मुंबई, १ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेले लेखानुदान २०२४ अर्थात हंगामी अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताचा संकल्प असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. लेखानुदान २०२४ ची फडणवीस यांनी सांगितलेली वैशिष्ट्ये एक कोटी कुटुंबांना सौरऊर्जा यंत्रणा देऊन ३०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा संकल्पगरीब, चाळीत, झोपडपट्टीत राहणारे, मध्यमवर्गीय यांना स्वत:चे घर घेण्यासाठी […]

विकसित भारताचा संकल्प

मुंबई, १ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेले लेखानुदान २०२४ अर्थात हंगामी अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताचा संकल्प असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

लेखानुदान २०२४ ची फडणवीस यांनी सांगितलेली वैशिष्ट्ये

एक कोटी कुटुंबांना सौरऊर्जा यंत्रणा देऊन ३०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा संकल्प
गरीब, चाळीत, झोपडपट्टीत राहणारे, मध्यमवर्गीय यांना स्वत:चे घर घेण्यासाठी योजना तयार करणार
एक लाख कोटींचा व्याजमुक्त निधी तयार करुन युवांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय
‘लखपती दिदी’ या कार्यक्रमातून तीन कोटी भगिनींना लखपती बनविण्याचा संकल्प
नऊ कोटी महिलांना महिला बचत गटांच्या माध्यमातून अर्थकारणाच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न
अकरा लाख कोटींची गुंतवणूक रस्ते, रेल्वे, पायाभूत सुविधांसाठी
शेतकर्‍यांसाठी नॅनो डीएपी, शेतकर्‍यांच्या शेतमालाला भाव आणि थेट बाजारपेठेशी जोडणी
विकासाची दिशा सांगणारा पण त्याचवेळी आर्थिक शिस्त पाळणारा असा हा अंतरिम अर्थसंकल्प (हंगामी अर्थसंकल्प)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number