नमो ११ कलमी कार्यक्रम

मुंबई, ८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ प्रत्येक पालकमंत्र्याने प्राधान्याने राबवावा. शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून राज्याच्या विकासाला गती द्यावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ बैठक सभागृह येथे ‘नमो ११ कलमी कार्यक्रमाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते […]

नमो ११ कलमी कार्यक्रम

मुंबई, ८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ प्रत्येक पालकमंत्र्याने प्राधान्याने राबवावा. शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून राज्याच्या विकासाला गती द्यावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ बैठक सभागृह येथे ‘नमो ११ कलमी कार्यक्रमाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीव्दारे शुभारंभ करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे.आम्ही सत्तेत आल्यापासून अनेक लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवत आहोत. दीड कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलो आहोत. या उपक्रमाच्या माध्यमातून विकास होण्यास मदत मिळत असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

शासन शेतक-यांच्या पाठिशी असून आपत्तीच्या काळात नियम बाजूला ठेवून आतापर्यंत दिलेली मदत ही आतापर्यंत दिलेली सर्वात अधिक मदत आहे. शेतक-यांसाठी शासनाचे अनेक प्रकल्प सुरू केले. पीक विमा योजना, प्रधानमंत्री नमो सन्मान योजना यासारख्या योजना राबविल्या जात आहेत. आरोग्य, शिक्षण, उद्योग,शेतकरी,महिला,कामगार,दिव्यांग,मागासवर्ग घटक अशा सर्व घटकांचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नमो ११ कलमी कार्यक्रमातून’ समाजातील सर्व घटकांना लाभ होईल: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘नमो ११ कलमी’ कार्यक्रमातून सर्व समाज घटकांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबवा. कामगार,महिला तसेच समाजातील इतर घटकांना विकासाच्या समान संधी उपलब्ध होण्यासाठी हा उपक्रम मदत करेल. प्रत्येक घटकाचे जीवनमान उंचावण्यासाठी नमो ११ कलमी कार्यक्रम मोलाची भूमिका बजावेल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number