नव्या संसदेत सादर झाले नारी शक्ती वंदन विधेयक

नवी दिल्ली, १९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधत मंगळवार १९ सप्टेंबर पासून सेंट्रल व्हिस्टा अर्थात नव्या इमारतीत संसदेच्या कामकाजाला सुरुवात झाली. नव्या संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे सरकार नारी शक्ती वंदन विधेयक सादर करणार असल्याचे जाहीर केले. यानंतर देशाचे कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी नारी शक्ती वंदन विधेयक लोकसभेत […]

नव्या संसदेत सादर झाले नारी शक्ती वंदन विधेयक

नवी दिल्ली, १९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधत मंगळवार १९ सप्टेंबर पासून सेंट्रल व्हिस्टा अर्थात नव्या इमारतीत संसदेच्या कामकाजाला सुरुवात झाली. नव्या संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे सरकार नारी शक्ती वंदन विधेयक सादर करणार असल्याचे जाहीर केले. यानंतर देशाचे कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी नारी शक्ती वंदन विधेयक लोकसभेत सादर केले.

लोकसभेत गदारोळ

मोदी सरकारने लोकसभेत नारी शक्ती वंदन विधेयक सादर केले. या विधेयकाद्वारे ३३ टक्के आरक्षणाचा प्रस्ताव केंद्र सरकारने लोकसभेत सादर केला. विधेयक सादर होताच विरोधकांनी लोकसभेत गदारोळ सुरू केला.

महत्त्वाचे

नारी शक्ती वंदन विधेयक लोकसभेत सादर : मंगळवार १९ सप्टेंबर २०२३

नारी शक्ती वंदन विधेयकावर लोकसभेत चर्चा : बुधवार २० सप्टेंबर २०२३

नारी शक्ती वंदन विधेयकावर राज्यसभेत चर्चा : गुरुवार २१ सप्टेंबर २०२३

नव्या संसदेत पहिल्या दिवशी काय झाले ?

राज्यसभेचे कामकाज तहकूब

खर्गेंच्या वक्तव्यावरून राज्यसभेत गदारोळ

राज्यसभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाषण

राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू
राज्यसभेचे कामकाज पुन्हा सुरू
राज्यसभेचे कामकाज सुरू, प्रमुख नेत्यांशी चर्चा करण्यासाठी थोड्या वेळासाठी तहकूब
नव्या संसदेतील लोकसभेचे पहिल्या दिवसाचे कामकाज तहकूब
काँग्रेस खासदारांनी पुन्हा गदारोळ सुरू केला
काँग्रेसने आणलेले विधेयक कधीच रद्द झाले : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
देशात सर्वात आधी महिला विधेयक काँग्रेसने संसदेत सादर केले : खा. अधीर रंजन चौधरी
काँग्रेस खासदारांचा गदारोळ सुरू
कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी नव्या संसदेतील लोकसभेत सादर केले नारी शक्ती वंदन विधेयक
केंद्र सरकार नारी शक्ती वंदन विधेयक आणणार, पंतप्रधान मोदींची घोषणा
नवी संसद १४० कोटी भारतीयांचे प्रतिनिधित्व करणार : पंतप्रधान मोदी
सेंट्रल व्हिस्टा अर्थात संसदेच्या नव्या इमारतीत लोकसभेचे कामकाज मंगळवारी दुपारी गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधत सुरू
खासदारांनी चालत संसदेच्या जुन्या इमारतीमधून नव्या इमारतीत प्रवेश केला

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number