नवी दिल्ली, १६ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मोदी विरोधकांची मध्य प्रदेशमधील सभा रद्द झाली आहे. ही सभा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार होती. सभा रद्द झाल्याचे मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी सांगितले. याआधी मोदी विरोधकांनी चौदा वृत्तनिवेदकांच्या कार्यक्रमांवर बंदी घातली. या वृत्तनिवेदकांच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहू तसेच त्यांना प्रतिक्रिया देणार नाही असे मोदी विरोधकांनी जाहीर केले. स्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य या मुद्यावर आक्रमकपणे बोलणाऱ्या मोदी विरोधकांनी वृत्तनिवेदकांवर बंदी घातल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.