भारत-पाकिस्तान सामन्यात पावसामुळे खोळंबा, उर्वरित सामना सोमवारी होणार

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात वारंवार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे सामना थांबवण्यात आला होता. सामना पुन्हा सुरु होणार, अशी शक्यता होती. त्याचवेळी वरुणराजाने पुन्हा हजेरी लावली. अखेर पंचांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम खेळण्याचे निमंत्रण दिले. कर्णधार रोहित शर्मा आणि युवा सलामीवीर शुभमन गिल यांनी भारताला […]

भारत-पाकिस्तान सामन्यात पावसामुळे खोळंबा, उर्वरित सामना सोमवारी होणार

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात वारंवार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे सामना थांबवण्यात आला होता. सामना पुन्हा सुरु होणार, अशी शक्यता होती. त्याचवेळी वरुणराजाने पुन्हा हजेरी लावली. अखेर पंचांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम खेळण्याचे निमंत्रण दिले. कर्णधार रोहित शर्मा आणि युवा सलामीवीर शुभमन गिल यांनी भारताला आक्रमक सुरुवात करून देत अर्धशतके ठोकली. दोघांनी १०० चेंडूत १२१ धावांची भागीदारी केली. विराट कोहली आणि केएल राहुल मैदानावर होते. पावसामुळे सामना थांबवण्यात आला तेव्हा भारतीय डावात केवळ २४.१ ओव्हर झाली होती. यावेळी भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात १४७ धावा होती. सोमवारी केएल राहुल आणि कोहली सामना सुरु करतील.

सामना कधी खेळला जाईल?

पावसामुळे व्यत्यय आला तर भारत-पाकिस्तान सामना रिझर्व्ह ठेवला जाणार होता. त्यामुळे आता ११ सप्टेंबरला हा सामना होईल.

सामना कधी सुरु होईल?

सामना भारतीय वेळेनुसार तीन वाजता सुरु होईल.

सामन्याचे स्वरुप काय असेल?

सोमवारचा सामना ५० ओव्हरचा असेल. याचा अर्थ भारत २४.१ ओव्हरपासून पुढे खेळायला सुरुवात करेल आणि पूर्ण ५० ओव्हर खेळेल. त्यानंतर पाकिस्तान फलंदाजी करेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number