देवेंद्र फडणवीस हे शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच नागपुरात आले आहेत . नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताची भाजपतर्फे जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. यावर पावसाचे सावट असले तरी भाजपकडून शहरात ठीकठिकाणी अभिनंदनाचे होर्डिंग लावण्यात आले आहेत.याशिवाय चौकाचौकात कार्यकर्त्यांतर्फे गुलाल आणि फुलांचा वर्षाव करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.नागपुर विमानतळावर नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे तर ढोल ताशा पथक, होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत , सोबतच फडणवीस यांच्या रॅली साठी रथ तयार करण्यात आला असून त्याच रथावर फडणवीस विमानतळ ते घरापर्यंत जाणार आहे. रथावर जनादेश मिळूनही पक्षादेश पाळणारा नागपूरचा सुपुत्र देवेंद्र फडणवीस अस लिहून भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री पदाचा त्याग करून उपमुख्यमंत्री पद स्वीकारणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर हजारो नागरिकांच्या वतीने स्वागत करण्यात होणार आहे. त्यासाठी विमानतळ ते फडणवीस यांच्या निवासस्थानापर्यंत स्कूटर रॅली सुद्धा काढली जाणार आहे.फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांची गर्दी दिसून येत आहे. तर या रॅली मध्ये असताना देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. फडणवीसांच्या नागपुरातील घरा पर्यंत रॅली काढण्यात येणार आहे शेकडो कार्यकर्त्याच्या उपस्थिती स्वागत रॅली सुरु झाली आहे. ढोल ताशांच्या गजरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले आहे. या स्वागता दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैण्यात करण्यात आला आहे.
Nagpur | फडणवीसांचं भाजप कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत | Marathi News