‘माणसं आपलीशी करण्यात फडणवीसांना यश’

राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. अतिशय अतीतटीत्या या निवडणुकीत भाजपाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.या निकालावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे, सहाव्या जागेसाठी दोन्ही बाजूकडे आवश्यक संख्याबळ नव्हते. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात भाजपला यश आले. त्यामुळे हा निकाल लागला. असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष […]

‘माणसं आपलीशी करण्यात फडणवीसांना यश’

राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. अतिशय अतीतटीत्या या निवडणुकीत भाजपाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.या निकालावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे, सहाव्या जागेसाठी दोन्ही बाजूकडे आवश्यक संख्याबळ नव्हते. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात भाजपला यश आले. त्यामुळे हा निकाल लागला. असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही कौतुक केले. शिवसेनेकडे फारसे संख्याबळ नसतानाही त्यांनी ही जागा लढवली. राजकारणात जोखीम पत्करावी लागते. शिवसेनेकडे असलेल्या मतांपेक्षा अधिक मते त्यांनी घेतली असल्याचे पवार यांनी सांगितले.

या राज्यसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची संख्या पाहता महाविकास आघाडीची मते फुटली नसल्याचे दिसून आले असल्याचे पवार यांनी म्हटले. भाजपला झालेले मतदान हे अपक्षांचे असल्याचे त्यांनी म्हटले. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, “आता सहावी जागा जी शिवसेनेने लढवली तिथे आमची गॅप पडत होती. मतांची संख्या कमी होती. पण, धाडस केलं आणि प्रयत्न केला, त्या प्रयत्नात अपक्षांची संख्या ही भाजपकडे अधिक होती आणि आमच्याकडे कमी होती. तरीही दोघांना पुरेशी नव्हती आणि त्यामुळे भाजपने आम्हाला पाठिंबा देऊ इच्छिणारे जे अपक्ष होते त्यांना आपल्या बाजूला घेण्यासाठी जी काही यशस्वी कारवाई केली त्यात फडणवीसांना यश आलं. चमत्कार झाला हे मान्य केलं पाहिजे. त्यामुळे हा फरक पडला. नाहीतर ही जी आघाडी आहे त्या आघाडीच्या एकंदर संख्येप्रमाणे त्यांना मतदान झालेलं आहे. त्यात वेगळं काही नाही’.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number