Iran-USA War: ‘आम्ही आधी हल्ला करत नाही, पण चोख प्रत्युत्तर देतो…’; इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांचा अमेरिकेला इशारा

राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपली भूमिका स्पष्ट करताना शेजारील राष्ट्रांनाही तंबी दिली आहे.

Iran-USA War: ‘आम्ही आधी हल्ला करत नाही, पण चोख प्रत्युत्तर देतो…’; इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांचा अमेरिकेला इशारा

Iran-USA War:  इस्रायल आणि अमेरिकेसोबतच्या संघर्षाला 1 महिना पूर्ण होत असताना, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी अमेरिकेला एक गंभीर इशारा दिला आहे. “आम्ही कोणत्याही युद्धाची किंवा हल्ल्याची सुरुवात स्वतःहून करत नाही; मात्र, जर कोणी आम्हाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, तर आमचे प्रत्युत्तर अत्यंत निर्णायक आणि कठोर असेल,” असे खडे बोल त्यांनी सुनावले आहेत. या विधानामुळे मध्यपूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला आहे.

‘X’ (ट्विटर) वरून मध्यपूर्वेतील देशांना इशारा
राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर आपली भूमिका स्पष्ट करताना शेजारील राष्ट्रांनाही तंबी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “जर तुम्हाला तुमच्या देशात सुरक्षा आणि विकास हवा असेल, तर तुमच्या भूभागाचा वापर आमच्या शत्रूंना (अमेरिका आणि इस्रायल) इराणवर हल्ला करण्यासाठी करू देऊ नका.” जर कोणत्याही देशाने अमेरिकेला लष्करी मदत किंवा जागा उपलब्ध करून दिली, तर त्यांनाही इराणच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

अमेरिकेचे 13 लष्करी तळ वापरासाठी अयोग्य
28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलने तेहरानवर केलेल्या हल्ल्यानंतर, इराणने ‘ऑपरेशन’ राबवून जोरदार प्रतिहल्ले सुरू केले आहेत. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (UAE), बहरीन, ओमान आणि कतार यांसारख्या देशांमधील अमेरिकन लष्करी तळ आणि ऊर्जा प्रकल्पांना इराणने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे लक्ष्य केले आहे. द न्यूयॉर्क टाइम्स च्या अहवालानुसार, इराणच्या या अखंड हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेतील अमेरिकेचे तब्बल 13 लष्करी तळ आता राहण्यायोग्य किंवा वापरासाठी अयोग्य ठरले आहेत, जो अमेरिकेसाठी मोठा लष्करी धक्का मानला जात आहे.

हेही वाचा – India Energy Policy: होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा मास्टरप्लॅन! या मित्रदेशासोबत करणार महत्त्वाचा करार

आर्थिक केंद्रं आणि पायाभूत सुविधांवर लक्ष
पेझेशकियान यांनी स्पष्ट केले की, इराणच्या आर्थिक केंद्रांना किंवा महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना धक्का लावण्याचा प्रयत्न झाल्यास, इराण आपल्या शत्रूंच्या तळांना उद्ध्वस्त करण्यास मागेपुढे पाहणार नाही. सध्या सुरू असलेल्या या संघर्षात इराणने वापरलेली प्रगत क्षेपणास्त्र प्रणाली आणि आत्मघाती ड्रोनमुळे अमेरिकेच्या संरक्षण फळीला मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या युद्धाचा परिणाम जागतिक इंधन दरांवरही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number