India Pakistan Naval Tension: अरबी समुद्रात भारत-पाक नौदलात तणाव; युद्धनौकांच्या धडकेनंतर पाकिस्तानकडून लाईव्ह फायरिंगची घोषणा

पाकिस्तानने या आंतरराष्ट्रीय नियमांचे उघडपणे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी केला आहे.<br/>

India Pakistan Naval Tension: अरबी समुद्रात भारत-पाक नौदलात तणाव; युद्धनौकांच्या धडकेनंतर पाकिस्तानकडून लाईव्ह फायरिंगची घोषणा

India Pakistan Naval Tension: उत्तर-पूर्व अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ भारत आणि पाकिस्तानच्या युद्धनौकांमध्ये झालेल्या धडकेनंतर दक्षिण आशियाई सागरी क्षेत्रात लष्करी तणाव अत्यंत टोकाला पोहोचला आहे. 15 सप्टेंबर रोजी भारतीय नौदलाची आघाडीची युद्धनौका INS कोलकाता नियमित गस्तीवर असताना, पाकिस्तानी नौदलाच्या PNS हुनैन या जहाजाने अत्यंत अव्यावसायिक आणि धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या बेजबाबदार कृत्यामुळे दोन्ही युद्धनौकांमध्ये थेट टक्कर झाली. 1991 च्या द्विपक्षीय करारातील कलम 10 नुसार दोन्ही देशांच्या नौदलांनी समुद्रात एकमेकांपासून किमान 3 नॉटिकल मैल (सुमारे 5.5 किमी) अंतर राखणे बंधनकारक आहे. पाकिस्तानने या आंतरराष्ट्रीय नियमांचे उघडपणे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी केला आहे.

पाकिस्तानकडून घाईघाईत लाईव्ह फायरिंगचा सराव

या सागरी अपघातानंतर लगेचच पाकिस्तानने ईशान्य अरबी समुद्रात घाईघाईने लाईव्ह नेव्हल फायरिंग एक्सरसाइज आयोजित करत 'NOTAM' (नोटीस टू एअरमेन) आणि नौकानयन इशारा प्रसिद्ध केला आहे. हा इशारा कोणत्याही क्षेपणास्त्र चाचणीसाठी नसून थेट गोळीबाराच्या सरावासाठी देण्यात आला आहे. या आक्रमक पाऊलामुळे संवेदनशील अरबी समुद्रातून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून खबरदारीचे निर्देश देण्यात आले आहेत. संरक्षण तज्ज्ञांच्या मते, भारतीय जहाजाशी टक्कर झाल्यानंतर पाकिस्तानने लागू केलेला हा सराव चिनी लष्करी रणनीतीचे अनुकरण मानले जात आहे. अमेरिका किंवा जपानसोबत तणाव वाढल्यावर चीन ज्याप्रमाणे सागरी क्षेत्रात लाईव्ह फायरिंगचा दबाव निर्माण करतो, तसाच प्रकार पाकिस्तानकडून केला जात आहे.

हेही वाचा – Bomb Threat: मोठी बातमी! सोमनाथ मंदिर आणि भाजप कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

P-8I विमाने आणि ड्रोनद्वारे पाकिस्तानवर बारीक लक्ष

या घटनेनंतर भारताने तातडीने पाकिस्तानी राजदूताला पाचारण करून या बेजबाबदार आणि अपरिपक्व वर्तनाबद्दल कडक शब्दांत फटकारले आहे. दुसरीकडे, अरबी समुद्रातील इराण संकट आणि दहशतवादी घुसखोरीचा धोका लक्षात घेता भारतीय नौदलाने आपला पहारा अधिक कडक केला आहे. भारतीय नौदल आपल्या बोईंग P-8I पोसायडन या अत्यंत अत्याधुनिक लांब पल्ल्याच्या सागरी गस्ती विमानांच्या मदतीने पाकिस्तानी नौदलाच्या प्रत्येक हालचालीवर रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल उपकरणांद्वारे 24 तास लक्ष ठेवून आहे. तसेच, पाकिस्तानच्या या लाईव्ह फायरिंग क्षेत्रावर भारतीय फ्रिगेट्स आणि नेव्हल ड्रोनच्या माध्यमातून सतत नजर ठेवली जात असून, कोणत्याही परिस्थितीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय नौदल पूर्णपणे सज्ज आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number