Jag Vikram: इराण-अमेरिका संघर्षाच्या विळख्यातून ‘जग विक्रम’ची सुटका; 20 हजार टन LPG घेऊन भारतीय जहाज कांडला बंदरात दाखल

20,400 मेट्रिक टन एलपीजी (LPG) चा साठा असलेले 'जग विक्रम' (Jag Vikram) हे जहाज मंगळवारी, 14 एप्रिल रोजी गुजरातच्या कांडला बंदरात सुखरूप दाखल झाले.

Jag Vikram: इराण-अमेरिका संघर्षाच्या विळख्यातून ‘जग विक्रम’ची सुटका; 20 हजार टन LPG घेऊन भारतीय जहाज कांडला बंदरात दाखल

Jag Vikram: अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. 20,400 मेट्रिक टन एलपीजी (LPG) चा साठा असलेले ‘जग विक्रम’ (Jag Vikram) हे जहाज मंगळवारी, 14 एप्रिल रोजी गुजरातच्या कांडला बंदरात सुखरूप दाखल झाले. अत्यंत संवेदनशील मानली जाणारी ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) 11 एप्रिल रोजी यशस्वीरित्या ओलांडल्यानंतर या जहाजाने भारताचा किनारा गाठला. बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मुकेश मंगल यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली असून, जहाजावरील 24 भारतीय खलाशी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

होर्मुझ सामुद्रधुनी पार करणारे नववे भारतीय जहाज
28 फेब्रुवारीपासून इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू झालेल्या लष्करी व राजनैतिक संघर्षाच्या काळात होर्मुझ सामुद्रधुनी पार करणारे ‘जग विक्रम’ हे भारताचे नववे जहाज ठरले आहे. यापूर्वी ‘एमटी शिवालिक’, ‘नंदा देवी’, ‘जग लाडकी’ आणि ‘पाइन गॅस’ यांसारख्या प्रमुख 8 ते 10 टँकर्सनी हा धोकादायक मार्ग पार करून भारत गाठला आहे. दरम्यान, या भागातील परिस्थिती अजूनही चिंताजनक असून, भारताची किमान 15 जहाजे अजूनही या सामुद्रधुनीच्या पश्चिमेकडील भागात अडकलेली आहेत. यामध्ये कच्च्या तेलाचे टँकर्स, कंटेनर जहाजे आणि रासायनिक टँकर्सचा समावेश आहे.

हेही वाचा – Donald Trump: ‘इराणला पुन्हा उभं राहायला 20 वर्षे लागतील’; अण्वस्त्रांच्या मुद्द्यावरून अमेरिकेची इराणला मोठी तंबी

का महत्त्वाचा आहे हा सागरी मार्ग?
जागतिक ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ हा अत्यंत मोक्याचा मार्ग मानला जातो. जगातील एकूण कच्च्या तेलाच्या पुरवठ्यापैकी सुमारे 20 टक्के पुरवठा याच अरुंद जलमार्गावरून होतो. इराण आणि ओमानच्या दरम्यान असलेला हा मार्ग सध्या युद्धाच्या छायेखाली आहे. अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या संघर्षामुळे इराणने हा मार्ग रोखून धरल्याने जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली असून, तेल आणि वायूच्या किमती मोठ्या प्रमाणावर वधारल्या आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत ‘जग विक्रम’चे भारतात आगमन होणे, हे भारताच्या ऊर्जा पुरवठ्यासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number