India slams Pakistan: संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताचा पाकिस्तानवर जोरदार प्रहार; हजारो जखमा देऊन रक्तबंबाळ करण्याऱ्या धोरणाचा केला पर्दाफाश

संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी, राजदूत परवथनेनी हरीश यांनी पाकिस्तानचे दावे पूर्णपणे मोडीत काढत त्यांना खडे बोल सुनावले.

India slams Pakistan: संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताचा पाकिस्तानवर जोरदार प्रहार; हजारो जखमा देऊन रक्तबंबाळ करण्याऱ्या धोरणाचा केला पर्दाफाश

India slams Pakistan: संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत मंगळवारी (UNSC) आंतरराष्ट्रीय व्यवस्था बळकट करण्याच्या विषयावरील चर्चेदरम्यान, भारताने पाकिस्तानच्या सीमापार दहशतवादाला सतत मिळत असलेल्या आश्रयावरून अत्यंत तीव्र शब्दांत टीका केली आहे. संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी, राजदूत परवथनेनी हरीश यांनी पाकिस्तानचे दावे पूर्णपणे मोडीत काढत त्यांना खडे बोल सुनावले. “पाकिस्तानकडून केला जाणारा सीमापार दहशतवादाचा वापर आणि भारताला ‘हजारो जखमा देऊन रक्तबंबाळ’ करण्याचे त्यांचे धोरण, हे संयुक्त राष्ट्रांच्या सनदेप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीच्या पोकळ दाव्यांचा उघड पर्दाफाश करते,” असे राजदूत हरीश यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्यापासूनचा पाकिस्तानचा इतिहास हा भारतावरील आक्रमणांनी आणि सीमापार दहशतवादाला दिलेल्या पाठिंब्यानेच डागाळला असल्याचे सांगत, इस्लामाबादने दहशतवादाच्या सर्व प्रकारांना दिलेला पाठिंबा विश्वसनीय आणि अपरिवर्तनीय रितीने थांबवावा, असे आवाहन भारताने आंतरराष्ट्रीय मंचावर केले.

हेही वाचा – Iran America Peace Agreement:इराण-अमेरिका शांतता करार का रखडला? डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘या’ 3 कडक अटींमुळे वाटाघाटीला ब्रेक

प्रादेशिक अखंडतेच्या उल्लंघनाचा पाढा

भारताच्या प्रतिनिधींनी इतिहास अधोरेखित करताना सांगितले की, स्वतंत्र भारताच्या वाटचालीची सुरुवातच मुळात पाकिस्तानच्या सीमापार आक्रमणांचा सामना करण्यापासून झाली होती. पाकिस्तानला भारताच्या अशा प्रदेशांचा हव्यास होता, जे प्रदेश पूर्णपणे, कायदेशीररित्या आणि कायमचे भारतात विलीन झाले होते. वेगवेगळ्या युद्धांच्या माध्यमातून, विनाकारण केलेल्या हल्ल्यांतून आणि भारताला लक्ष्य करणाऱ्या दहशतवादी कारवायांतून पाकिस्तानने सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाच्या तत्त्वांचे वारंवार उल्लंघन केल्याचा आरोप भारताने केला. अशा सीमापार दहशतवादापासून स्वतःचे रक्षण करण्याचा भारताला पूर्ण अधिकार असून, या दहशतवादी कारवायांना पाठबळ देण्याचे गंभीर परिणाम पाकिस्तानला भोगावेच लागतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तानला फटकारले 
पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांमध्ये पुन्हा एकदा काश्मीरचा राग अलापल्यानंतर भारताने त्यांना अत्यंत सडेतोड प्रत्युत्तर दिले. संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानचे प्रतिनिधी राजदूत आसिम इफ्तिखार अहमद यांनी जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला असता, भारताने पाकिस्तानच्या ‘नरसंहाराच्या कृत्यांच्या दीर्घकालीन डागाळलेल्या इतिहासावर’ कडाडून प्रहार केला. नरसंहाराचा एवढा मोठा इतिहास पाठीशी असलेल्या देशाने भारताच्या पूर्णपणे अंतर्गत असलेल्या मुद्द्यांवर बोलणे ही अत्यंत विडंबनात्मक आणि हास्यास्पद बाब असल्याचे राजदूत हरीश यांनी ‘सशस्त्र संघर्षांमधील नागरिकांचे संरक्षण’ या विषयावरील खुल्या चर्चेत म्हटले. पाकिस्तानचा हा सीमापार दहशतवादाचा सातत्यपूर्ण धोका केवळ भारतासाठीच नव्हे, तर प्रादेशिक शांतता, स्थिरता आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेसमोर एक मोठे आव्हान म्हणून कायम असल्याचे भारताने नमूद केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number