Bhote Koshi River Flood: विनाशकारी पुरामुळे हाहाकार; 1000 लोकं वाहून गेल्याची भीती, हायवे अन् पूल उद्ध्वस्त

लेंडे खोला (भोटे कोशी) नदीची पाणीपातळी अत्यंत वेगाने वाढल्यामुळे रसुवा सीमा तपासणी नाका, तिमुरे बाजार आणि त्यासमोरील 2 प्रमुख व्यापारी परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत.

Bhote Koshi River Flood: विनाशकारी पुरामुळे हाहाकार; 1000 लोकं वाहून गेल्याची भीती, हायवे अन् पूल उद्ध्वस्त

Bhote Koshi River Flood: तिबेटच्या बाजूने अचानक आलेल्या प्रचंड आणि अनियंत्रित पुरामुळे नेपाळच्या उत्तर भागातील रसुवा जिल्ह्यात अभूतपूर्व आपत्ती ओढवली आहे. लेंडे खोला (भोटे कोशी) नदीची पाणीपातळी अत्यंत वेगाने वाढल्यामुळे रसुवा सीमा तपासणी नाका, तिमुरे बाजार आणि त्यासमोरील 2 प्रमुख व्यापारी परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. या अचानक आलेल्या महापुरात तब्बल 1,000 हून अधिक नागरिक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुराच्या प्रचंड वेगामुळे सीमा शुल्क (कस्टम्स) कार्यालयातील अनेक वाहने, कोट्यवधी रुपयांचा माल आणि नव्याने बांधलेला महत्त्वाचा पूल क्षणात वाहून गेला.

पोलीस ठाण्यांसह जलविद्युत प्रकल्प पाण्याखाली

रसुवा जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 9 च्या सुमारास या अनपेक्षित जलप्रलयाचा तडाखा तिमुरे परिसराला बसला. पाण्याच्या शक्तिशाली प्रवाहामुळे नदीच्या खालील भागातील जलविद्युत प्रकल्प पार उद्ध्वस्त झाले आहेत. या दुर्घटनेत नेपाळ पोलिसांच्या 3 प्रमुख कार्यालयांचे प्रचंड नुकसान झाले आहे, ज्यामध्ये तिमुरे येथील एरिया पोलीस ऑफिस तसेच स्याफ्रुबेसी आणि रसुवागढी येथील पोलीस चौक्यांचा समावेश आहे. पुराचा हा वेगाने वाढणारा प्रभाव थेट नुवाकोट जिल्ह्यापर्यंत पोहोचला असून, खबरदारीचा उपाय म्हणून काठमांडूवरून रसुवा, नुवाकोट, चितवन आणि धाडिंगकडे जाणारी सर्व वाहतूक तातडीने रोखण्यात आली आहे.

सैन्याची 2 हेलिकॉप्टर्स रसुवाकडे रवाना; बालेन्द्र शाह यांचे निर्देश

आपत्तीची तीव्रता लक्षात घेता नेपाळ लष्कराची 2 विशेष हेलिकॉप्टर्स तातडीने रसुवातील पूरग्रस्त भागात मदत व बचाव कार्यासाठी रवाना करण्यात आली आहेत. नेपाळ लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल राजाराम बस्नेत यांनी या मोहिमेला दुजोरा दिला आहे. दरम्यान, पंतप्रधान बालेन्द्र शाह यांच्या सचिवालयाने देशातील सर्व खासगी व सरकारी हेलिकॉप्टर कंपन्यांना आपत्कालीन प्रसंगासाठी ‘स्टँडबाय’ मोडवर राहण्याचे कडक निर्देश दिले आहेत. रसुवा, नुवाकोट, धाडिंग, गोरखा आणि चितवन या 5 संवेदनशील जिल्ह्यांतील नदीकाठच्या नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्याची मोहीम राबवली जात आहे.

हेही वाचा – Hospital Fire : हृदयद्रावक घटना! रुग्णालयात AC कॉम्प्रेसरच्या स्फोटाने लागलेल्या आगीत 15 नवजात बालकांचा अंत

गृहमंत्री सुदान गुरुंग यांची तातडीची बैठक आणि सार्वजनिक आवाहन

परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गृहमंत्री सुदान गुरुंग यांच्या अध्यक्षतेखाली ‘मान्सून प्रतिसाद कमांड पोस्ट’ची उच्चस्तरीय बैठक पार पडली. गृहमंत्र्यांनी मुग्लिनपर्यंत पसरलेल्या भोटे कोशी आणि त्रिशुली नद्यांच्या संपूर्ण किनारपट्टीवर ‘हाय अलर्ट’ घोषित केला आहे. नागरिकांना पृथ्वी हायवे आणि गल्छी-नुवाकोट-रसुवा मार्गावरील प्रवास टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही आणीबाणीच्या मदतीसाठी प्रशासनाने 1234 हा टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक जारी केला असून, नागरिकांना प्रशासकीय सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number