Vijay Hazare Trophy: विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार की नाही? अखेर निर्णय झाला; पंतकडे सोपवण्यात आली दिल्लीची धुरा

2025-26 विजय हजारे ट्रॉफी हंगाम 24 डिसेंबरपासून सुरू होत असून, दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (डीडीसीए) विराट कोहली आगामी हंगामातील पहिल्या 2 सामन्यांसाठी उपलब्ध असल्याची अधिकृत माहिती दिली आहे.

Vijay Hazare Trophy: विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार की नाही? अखेर निर्णय झाला; पंतकडे सोपवण्यात आली दिल्लीची धुरा

Vijay Hazare Trophy: विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार की नाही, याबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 2025-26 विजय हजारे ट्रॉफी हंगाम 24 डिसेंबरपासून सुरू होत असून, दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (डीडीसीए) विराट कोहली आगामी हंगामातील पहिल्या 2 सामन्यांसाठी उपलब्ध असल्याची अधिकृत माहिती दिली आहे. कोहलीने स्वतः डीडीसीएला आपली उपलब्धता कळवली असल्याचे सांगण्यात आले आहे.

ऋषभ पंतची दिल्ली संघाच्या कर्णधारपदी निवड

या हंगामासाठी ऋषभ पंतची दिल्ली संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. कोहलीसोबतच ऋषभ पंत आणि अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा हे देखील संघाचा भाग असतील. तसेच नवदीप सैनीनेही आपली उपलब्धता निश्चित केली असून, वेगवान गोलंदाज हर्षित राणा उपलब्ध झाल्यास संघात सामील होणार आहे. डीडीसीएने विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्या 2 सामन्यांसाठी 20 सदस्यीय संघ जाहीर केला असून, आयुष बदोनीची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. नितीश राणा, यश धुल, प्रियांश आर्य यांसारख्या युवा खेळाडूंनाही संघात संधी देण्यात आली आहे.

हेही वाचा – IND vs PAK: भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने! अंडर-19 आशिया कपमध्ये रंगणार महासंग्राम

दिल्ली आपला पहिला सामना 24 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशविरुद्ध, तर दुसरा सामना 26 डिसेंबर रोजी गुजरातविरुद्ध खेळणार आहे. हे दोन्ही सामने बंगळूरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहेत. या सामन्यांमध्ये विराट कोहली अंतिम संघात असण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत प्रभावी फलंदाजी केल्यानंतर, देशांतर्गत स्पर्धेत कोहलीकडून कशी कामगिरी होते याकडे सर्वांचे लक्ष असेल. दिल्ली संघाला गट डी मध्ये 24 डिसेंबर ते 8 जानेवारी दरम्यान एकूण 7 सामने खेळायचे आहेत. मात्र, 11 जानेवारीपासून भारताची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका सुरू होणार असल्याने, पंत आणि कोहली संपूर्ण स्पर्धेसाठी उपलब्ध असतील की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

हेही वाचा – Rohit Sharma: विजय हजारे ट्रॉफीमध्ये रोहित शर्मासह दोन स्टार खेळाडू खेळणार नाहीत; संघ व्यवस्थापकाने कारण सांगत म्हटलं की, 'तरुण खेळाडू…'

विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्या 2 सामन्यांसाठी दिल्लीचा संघ

ऋषभ पंत (कर्णधार), आयुष बदोनी (उपकर्णधार), विराट कोहली, अर्पित राणा, यश धुल, सार्थक रंजन, प्रियांश आर्य, तेजस्वी सिंग (यष्टिरक्षक), नितीश राणा, हृतिक शोकीन, हर्ष त्यागी, सिमरजीत सिंग, प्रिन्स यादव, दिविज मेहरा, आयुष डोसेजा, वैभव कांडपाल, रोहन राणा, इशांत शर्मा, नवदीप सैनी. दरम्यान, विराट कोहलीच्या उपस्थितीमुळे दिल्ली संघाचा आत्मविश्वास वाढला असून, विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number