Todays Gold-Silver Rate : सोन्यात गुंतवणूक करताय? आजचे दर पाहिलात तर तुमचीही झोप उडेल; जाणून घ्या १० ग्रॅमचे ताजे दर

आज सोन्याच्या भावात वाढ झाली असून, जागतिक आणि स्थानिक घटकांमुळे हे दर उच्च पातळीवर पोहोचले आहेत. जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज सोन्याचे दर जाणून घ्या...

Todays Gold-Silver Rate : सोन्यात गुंतवणूक करताय? आजचे दर पाहिलात तर तुमचीही झोप उडेल; जाणून घ्या १० ग्रॅमचे ताजे दर

आज सोन्याच्या भावात वाढ झाली असून, जागतिक आणि स्थानिक घटकांमुळे हे दर उच्च पातळीवर पोहोचले आहेत. हे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, चलन विनिमय दर आणि स्थानिक करांनुसार (जीएसटी) बदलू शकतात. भारतीय बाजारात सोन्याच्या घरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज सोन्याचे दर जाणून घ्या… आज 16 फेब्रुवारी 2026 रोजी देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 155,120 रुपये आहे. तर 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 142,193 रुपये आहे. तसेच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम साधारणपणे 1,55,000 ते 1,60,000 आणि 22 कॅरेट 1,42,000 ते 1,46,000 च्या दरम्यान आहेत. तर 1 किलो चांदीचा दर 237,810 रुपये आहे. याशिवाय 10 ग्रॅम चांदीचा दर 2,378 रुपये आहे. 

हेही वाचा- How is Stock Market Today: दिलासा नाहीच! गेल्या आठवड्यात कोसळलेला बाजार आजही सावरला नाही; 'हे' शेअर्स ठरले धोकेबाज

जाणून घ्या शहरानुसार सोन्याचे दर कसे आहेत? 
स्थानिक कर आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसमुळे मुंबई, पुणे, जळगाव शहरांनुसार किमतीत अल्प फरक असू शकतो.  मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 141,964 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 154,870 आहे. त्याचसोबत पुण्यात    प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 141,964 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 154,870 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 141,964 रुपये असून    24 कॅरेट सोन्याचा दर 154,870 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 141,964 रुपये आहे, तसेच    24 कॅरेट सोन्याचा दर 154,870 रुपये आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरमध्ये स्थानिक कर, जागतिक अनिश्चितता आणि मागणीमुळे सोन्याच्या किंमतीत सातत्याने तेजी दिसून येत आहे. 

हेही वाचा- Inflation Rate : सर्वसामान्यांना महागाईच्या झळा, होलसेल बाजारात महागाईत सलग तिसऱ्या महिन्यात वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे आणि देशांतर्गत सराफा बाजारातही आज सोन्याच्या किमतीत वाढ दिसून आली आहे. सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. जागतिक बाजारातील घडामोडी आणि भारतीय रुपयाच्या मूल्यातील बदलांमुळे चांदीच्या भावात चढ-उतार होत आहेत. भू-राजकीय तणाव आणि केंद्रीय बँकांकडून खरेदीमुळे सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. सोन्याच्या किमतीत तेजी असून, 2026 मध्ये तेजीत राहण्याची शक्यता आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number