Lalit Modi: अंडरवर्ल्डकडून मुलाचे अपहरण अन् जीवे मारण्याचा प्रयत्न; ललित मोदींचा 16 वर्षांनंतर खळबळजनक गौप्यस्फोट

नुकत्याच दिलेल्या एका प्रदीर्घ मुलाखतीत त्यांनी मॅच-फिक्सिंगला नकार दिल्यामुळे अंडरवर्ल्डने त्यांच्यावर सूड उगवल्याचा दावा केला.

Lalit Modi: अंडरवर्ल्डकडून मुलाचे अपहरण अन् जीवे मारण्याचा प्रयत्न; ललित मोदींचा 16 वर्षांनंतर खळबळजनक गौप्यस्फोट

Lalit Modi: भारतीय प्रीमियर लीगचे (IPL) जनक आणि माजी आयुक्त ललित मोदी यांनी तब्बल 16 वर्षांनंतर आपल्या आयुष्यातील एका अत्यंत थरारक आणि धक्कादायक अनुभवाचा खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका प्रदीर्घ मुलाखतीत त्यांनी मॅच-फिक्सिंगला नकार दिल्यामुळे अंडरवर्ल्डने त्यांच्यावर सूड उगवल्याचा दावा केला. "मी तडजोड न केल्यामुळे दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांसारख्या टोळ्या माझ्या मागावर लागल्या, इतकेच नव्हे तर त्यांनी माझ्या मुलाचे अपहरण केले आणि जगभरात मला जीवे मारण्याचे प्रयत्न झाले," असा खळबळजनक आरोप ललित मोदी यांनी केला आहे. Wisden Cricket च्या 'The Scoop' या पॉडकास्टमध्ये बोलताना ललित मोदी यांनी मॅच-फिक्सिंग, गुन्हेगारी विश्वाकडून आलेले दबाव आणि त्यांच्यावर लावण्यात आलेल्या 'फरार' या शिक्क्यावर सविस्तर भाष्य केले. मे 2010 पासून लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या मोदींनी या साडेतीन तासांच्या संभाषणात अनेक जुन्या प्रकरणांना उजाळा दिला.

'मी फिक्सिंग झुगारले म्हणून दाऊद-शकील मागे लागले'
क्रिकेटमधील काळ्या विश्वाचा पर्दाफाश करताना ललित मोदी म्हणाले, "ज्या अंडरवर्ल्ड डॉननी मला मॅच-फिक्सिंगच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता, त्यांनीच पुढे जाऊन गुरुनाथ मय्यप्पन याच्याशी संधान साधले. मी त्यांच्या धमक्यांना भीक घातली नाही आणि चुकीच्या गोष्टींकडे कानाडोळा करण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळेच ते माझ्या जीवावर उठले. माझ्या मुलाचे अपहरण करण्यात आले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर माझा छळ करण्यात आला. अंडरवर्ल्डच्या या गुन्हेगारांना हलक्यात घेणे अत्यंत महागात पडू शकत होते."

क्रिकेटमधील फिक्सिंगवर महत्त्वाचे मत
सध्याच्या क्रिकेटमधील फिक्सिंगच्या स्वरूपावर बोलताना ते म्हणाले, "खेळातील फिक्सिंगचे स्वरूप आता अधिक प्रगत आणि अत्याधुनिक झाले आहे. मात्र, सध्याच्या आयपीएलमध्ये असे प्रकार घडत असतील असे मला वाटत नाही. आज आयपीएलमधील आर्थिक व्यवहार आणि खेळाडूंचे मानधन इतके अफाट आहे की, कोणत्याही खेळाडूला एवढी मोठी जोखीम पत्करून फिक्सिंग करण्याची गरज उरलेली नाही."

'फरार' असल्याचा दावा फेटाळला; कायदेशीर कारवाईवर स्पष्टीकरण
भारतात परत न येण्याबाबत आणि त्यांच्यावर असलेल्या 'भगोडा' या शिक्क्यावर त्यांनी कडक शब्दांत आक्षेप घेतला. ते म्हणाले, "मी कायदेशीर कचाट्यामुळे लंडनमध्ये राहत असल्याचा समज पूर्णपणे खोटा आहे. माझ्यावर कोणत्याही न्यायालयात किंवा सरकारी संस्थेकडे एकही खटला प्रलंबित नाही. एन. श्रीनिवासन यांनी दाखल केलेल्या एका जुन्या एफआयआरचा अपवाद वगळता माझ्याविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही. जर माझ्यावर कोणताही खटलाच नसेल, तर मला 'फरार' कसे म्हणता येईल?"

हेही वाचा – BCCI: टीम इंडियात खेळायचं असेल तर 'हे' सिद्ध करा! रोहित-हार्दिकसाठी BCCIचा मोठा इशारा

आपल्या सध्याच्या स्थितीबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, त्यांनी आपले सर्व कर वेळेत भरले असून सरकारचे कोणतेही देणे शिल्लक नाही. "मी आता पूर्णपणे निवृत्त झालो असून बीसीसीआय किंवा आयपीएलशी माझा दूरवरचा संबंध नाही. भारतातील सर्व कौटुंबिक व्यवसाय आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या मी माझ्या मुलांकडे सोपवल्या असून मी लंडनमध्ये अत्यंत समाधानी जीवन जगत आहे," असेही मोदींनी शेवटी नमूद केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number