Smriti Mandhana: हळद लागली, नवरी सजली; स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाच्या हळदीचा धमाल व्हिडीओ समोर

सांगलीतील स्मृती मंधानाच्या हळदी समारंभात जेमिमा, शफाली, रेणुका, राधा आणि अरुंधती रेड्डी यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. पारंपरिक पोशाख, नृत्य आणि आनंदी वातावरणामुळे सोहळा खास ठरला.

Smriti Mandhana: हळद लागली, नवरी सजली; स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाच्या हळदीचा धमाल व्हिडीओ समोर

सांगली: भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि देशाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना हिच्या लग्नसोहळ्याची तयारी सांगलीत उत्साहात सुरु आहे. वनडे वर्ल्डकपचे विजेतेपद नुकतेच पटकावलेल्या भारतीय महिला संघातील अनेक दिग्गज खेळाडू स्मृतीच्या घरी दाखल झाले असून, संपूर्ण परिसरात लग्नाची लगबग दिसत आहे. स्मृती मंधाना आणि म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा 23 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार असून त्यापूर्वी हळदीचा कार्यक्रम रंगात आला आहे.

सांगलीतील स्मृतीच्या घरी जेमिमा रॉड्रिग्स, शफाली वर्मा, रेणुका सिंह, राधा यादव, अरुंधती रेड्डी यांसारख्या महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडूंची उपस्थिती या सोहळ्याची शान वाढवणारी ठरली आहे. 21 नोव्हेंबरला झालेल्या हळदी समारंभात सर्वजणी पारंपरिक पिवळ्या पोशाखात आकर्षक दिसत होत्या. स्मृतीसोबत केलेल्या त्यांच्या नृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे. त्यांच्या डान्स, मस्ती आणि स्मृतीसोबतच्या खास क्षणांनी हळदीचा सोहळा अविस्मरणीय केला.

हेही वाचा: Pimpri Chinchwad Election : मतदार यादीत मोठ्या चुका! 1261 मतदारांची नावंच नाहीत, मतदारांच्या प्रभागांमध्येही बदल

स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल हे गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना वेळ देत होते. त्यांचे नाते चर्चेत असले तरी त्यांनी याबाबत कधीही सार्वजनिकरीत्या काहीही सांगितले नव्हते. अखेर 2 नोव्हेंबरला भारतीय महिला संघाने वनडे वर्ल्डकप जिंकताच, हाच विजयाचा क्षण पलाश मुच्छलने आयुष्यभराची आठवण बनवला. डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये त्याने स्मृतीला अंगठी घालून लग्नाची मागणी घातली आणि स्मृतीनेही मनापासून होकार देत या नात्यावर शिक्कामोर्तब केले.

आता 23 नोव्हेंबरच्या लग्नसोहळ्याकडे सर्व चाहत्यांचे, क्रिकेटप्रेमींचे आणि सहकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. हळदी समारंभातील उत्साह पाहता, स्मृती मंधाना पलाश मुच्छल यांचा विवाहसोहळाही तितकाच गगनाला भिडणारा असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Nana Patole: मुख्यमंत्र्यांच्या मामेबंधूंच्या बिनविरोध विजयानंतर राजकारण तापले; नाना पटोले यांचा हल्लाबोल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number