IPL 2026 MI vs KKR : पहिल्याच सामन्यात चमकला MI चा लोकल बॉय; घरच्या मैदानावर ठरला मॅन ऑफ द मॅच

रविवारी 29 मार्चला आयपीएल 2026 या 19 हंगामातील दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध केकेआर यांच्यात पार पडला. यावेळी मुंबई इंडियन्सने केकेआरचा दारूण पराभव केला.

IPL 2026 MI vs KKR : पहिल्याच सामन्यात चमकला MI चा लोकल बॉय; घरच्या मैदानावर ठरला मॅन ऑफ द मॅच

रविवारी 29 मार्चला आयपीएल 2026 या 19 हंगामातील दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध केकेआर यांच्यात पार पडला. यावेळी मुंबई इंडियन्सने केकेआरचा दारूण पराभव केला. केकेआरने दिलेल्या आव्हानाला सडेतोड उत्तर देत मुंबई इंडियन्सकडून धावांचा पाऊस पडताना दिसत होता. एकीकडे धावांचा पाऊस पाडत असताना दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी देखील चोख भूमिका बजावली. यावेळी मुंबई इंडियन्सच्या विजयात शार्दुल ठाकूरने महत्त्वाची भूमिका बजावली. शार्दुल ठाकूरने आपल्या 4 षटकांत 39 धावांत फिन ऍलन, अजिंक्य रहाणे आणि कॅमेरॉन ग्रीन या तीन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. त्यासाठी शार्दुलचा सामनावीर पुरस्काराने सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे शार्दूलने मुंबईकडून पदार्पणातील सामन्यात ही कामगिरी करुन दाखवली. मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा शार्दुल 2015 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. 

हेही वाचा- IPL 2026 MI vs KKR : 14 वर्षांचा इतिहास अखेर बदलला! रोहित-रायनची कडक ओपनिंग; MI ने घरच्या मैदानात KKR चा धुव्वा उडवला
मुंबई इंडियन्सची विजयी सुरुवात 
नाणेफेकीचा कौल जिंकलेल्या मुंबईने प्रथम गोलंदाजांचा निर्णय घेतला. दरम्यान कोलकाताने मुंबईसमोर 221 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान पुर्ण करण्यासाठी मुंबई इंडियन्सकडून सुरुवातीला रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन ही सलामी जोडी मैदानात उतरली. ओपनिंगला आलेल्या या जोडीने मुंबईला शतकी सुरुवात करुन दिली. रोहितने 78 धावा तर रायन रिकेल्टन याने 81 धावांची भागीदारी करत 11.5 ओव्हरमध्ये 148 धावांचा टप्पा ओलांडला. तसेच सूर्याने 16 आणि तिलक वर्मा याने 20 धावा केल्या. तर कॅप्टन हार्दिक पंड्या आणि नमन धीर यांनी 23 धावांची भागीदारी करत मुंबईला विजयी होण्यासाठी योगदान दिलं. यावेळी शार्दुल ठाकुर याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. त्यासाठी शार्दुलला मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. मुंबई इंडियन्सने आपला शेवटचा पहिला आयपीएल सामना 2012 मध्ये जिंकला होता. त्यानंतर आयपीएल 2026 मध्ये केकेआर विरुद्ध जिंकला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number