Sanju Samson: काळजाचा ठोका चुकला! संजूचा ‘तो’ शॉट लागताच पंच मैदानातच कोसळले; पहा व्हिडीओ

भारतीय फलंदाज संजू सॅमसनने मारलेला एक वेगवान चेंडू थेट पंचांना लागला, ज्यामुळे ते वेदनेने कळवळत जमिनीवर कोसळले.

Sanju Samson: काळजाचा ठोका चुकला! संजूचा ‘तो’ शॉट लागताच पंच मैदानातच कोसळले; पहा व्हिडीओ

Sanju Samson: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचव्या T20 सामन्यादरम्यान मैदानावर एक थरारक दृश्य पाहायला मिळाले. भारतीय फलंदाज संजू सॅमसनने मारलेला एक वेगवान चेंडू थेट पंचांना लागला, ज्यामुळे ते वेदनेने कळवळत जमिनीवर कोसळले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

काळजाचा ठोका चुकवणारी घटना  

ही घटना सामन्यातील 9 व्या षटकात घडली. दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू डोनोवेन फेरेरिया गोलंदाजी करत होता आणि संजू सॅमसन फलंदाजीच्या स्ट्राईकवर होता. संजू तेव्हा आक्रमक पवित्र्यात होता आणि मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात होता. षटकाच्या चौथ्या चेंडूवर संजूने सरळ रेषेत (Straight Drive) एक अतिशय शक्तिशाली फटका मारला. चेंडूचा वेग इतका प्रचंड होता की, गोलंदाजाला तो रोखणे कठीण झाले. चेंडू गोलंदाजाच्या हाताला घासून थेट समोर उभे असलेले पंच रोहन पंडित यांच्या पायावर जाऊन आदळला.

हेही वाचा – Hardik Pandya: हार्दिक पांड्याची दमदार खेळी; अवघ्या 16 चेंडूत 50 धावा पूर्ण, इतक्या कमी चेंडूत अर्धशतक करणारा दुसरा भारतीय

पंच मैदानातच कोसळले 

चेंडूचा फटका इतका जोरात होता की पंच रोहन पंडित वेदनेने विव्हळत थेट खेळपट्टीवर कोसळले. हे पाहून मैदानावरील खेळाडू आणि प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला. पंचांना दुखापत झाल्याचे पाहताच संजू सॅमसन धावत त्यांच्याकडे गेला. काही वेळातच दक्षिण आफ्रिकेच्या वैद्यकीय पथकाने (Doctors) मैदानात धाव घेत पंचांवर प्राथमिक उपचार केले.

हेही वाचा –  Vijay Hazare Trophy: विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार की नाही? अखेर निर्णय झाला; पंतकडे सोपवण्यात आली दिल्लीची धुरा

संजू सॅमसनची खेळी  

संजू सॅमसन या सामन्यात चांगल्या लयीत दिसत होता. पंचांना चेंडू लागल्याच्या घटनेनंतर, पुढच्याच षटकातील पहिल्या चेंडूवर संजू बाद झाला. संजूने 22 चेंडूंत 37 धावांची वेगवान खेळी केली. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 2 षटकार लगावले. पंचांना चेंडू लागल्याने काही काळ खेळ थांबला होता, मात्र उपचारानंतर त्यांनी पुन्हा आपली जबाबदारी सांभाळली, ज्यामुळे चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number