Mumbai Indians : रोहितला हार्दिकचा इशारा? मुंबई इंडियन्सने फेटाळल्या अफवा; दोन शब्दांत दिले चोख उत्तर

आयपीएल 2026 चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या गोटातून एक खळबळजनक चर्चा समोर आली होती. यावर अखेर मुंबई इंडियन्सलाच उत्तर द्यावे लागले आहे.

Mumbai Indians : रोहितला हार्दिकचा इशारा? मुंबई इंडियन्सने फेटाळल्या अफवा; दोन शब्दांत दिले चोख उत्तर

Mumbai Indians on Rohit Sharma and Hardik Pandya : आयपीएल 2026 चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या गोटातून एक खळबळजनक चर्चा समोर आली होती. कर्णधार हार्दिक पांड्याने माजी कर्णधार रोहित शर्माला त्याच्या खराब कामगिरीवरून इशारा दिल्याची अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरली होती. या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, जर रोहितला या हंगामात धावा करता आल्या नाहीत, तर संघ व्यवस्थापन कठोर पावले उचलेल. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत मुंबई इंडियन्सने अधिकृतपणे या अफवांचे खंडन केले आहे.

काय होती ती ‘विचित्र’ सोशल मीडिया पोस्ट?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दाव्यानुसार, हार्दिक पांड्याने रोहित शर्माच्या फॉर्मबद्दल संघ व्यवस्थापनाकडे नाराजी व्यक्त केली होती. रोहित गेल्या काही हंगामात सरासरी 200 ते 300 धावाच करू शकला असून, तो संघाच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे या वर्षी त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असून अपयशी ठरल्यास त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा हार्दिकने दिल्याची चर्चा रंगली होती. या अजब दाव्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रमाचे आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा – Sunil Gavaskar : जिवावर उदार होऊन देशासाठी बॅटिंग.. नरी कॉन्ट्रॅक्टर यांचा ‘तो’ किस्सा सांगताना ‘लिटिल मास्टर’ भावुक; पाहा Video

मुंबई इंडियन्सचा ‘मजेशीर’ खुलासा
या चर्चांनी गंभीर रूप धारण केल्यावर मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलने यावर प्रतिक्रिया दिली. फ्रँचायझीने केवळ दोन शब्दांत— “कुछ भी…” (काहीही काय!) असे उत्तर देत या सर्व अफवा फेटाळून लावल्या. सोबतच त्यांनी हार्दिक पांड्याचा एक मजेशीर GIF शेअर केला, ज्यातून हे स्पष्ट झाले की हार्दिक आणि रोहित यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. व्यवस्थापनाने नेहमीच या दोघांमधील संबंध चांगले असल्याचे सांगितले असून हा दावा पूर्णपणे निराधार असल्याचे दिसत आहे.

रोहितचा फॉर्म आणि आयपीएल 2026 ची तयारी
आकडेवारीनुसार, रोहित शर्माला 2013 पासून एकाही आयपीएल हंगामात 500 धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही आणि गेल्या हंगामात त्याने 15 सामन्यांत 418 धावा केल्या होत्या. याच फॉर्मचा आधार घेऊन अफवा पसरवल्या गेल्या होत्या. दरम्यान, आयपीएलचा 19 वा हंगाम 28 March 2026 पासून सुरू होत असून बीसीसीआयने (BCCI) सुरुवातीच्या सामन्यांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज असून मुंबईचे चाहते आता केवळ खेळावर लक्ष केंद्रित करून बसले आहेत.

हेही वाचा – Suryakumar Yadav: विश्वविजेतेपदाची ट्रॉफी घेऊन सूर्यकुमार यादवने घेतलं बाप्पाचं दर्शन; गौतम गंभीरसह सिद्धिविनायकाच्या चरणी झाला नतमस्तक

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number