‘आयएनएस वागीर’ पाणबुडीची समुद्री चाचणी सुरू

‘प्रोजेक्ट ७५’अंतर्गत आतापर्यंत चार पाणबुड्या भारतीय नौदलात सामील करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ‘प्रोजेक्ट ७५’च्या पाचव्या पाणबुडीच्या समुद्री चाचण्या सुरू झाल्या असून लवकरच पाचवी पाणबुडी भारतीय नौदलात सामील होणार आहे. ‘प्रोजेक्ट ७५’च्या पाचव्या पाणबुडीच्या समुद्री चाचण्या सुरू झाल्या आहेत. या अंतर्गत प्रोपल्शन सिस्टीम, शस्त्रे आणि संवेदी उपकरणांची चाचणी घेतली जाणार असल्याचे, भारतीय नौदलाने सांगितले आहे. तसेच […]

‘आयएनएस वागीर’ पाणबुडीची समुद्री चाचणी सुरू

‘प्रोजेक्ट ७५’अंतर्गत आतापर्यंत चार पाणबुड्या भारतीय नौदलात सामील करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ‘प्रोजेक्ट ७५’च्या पाचव्या पाणबुडीच्या समुद्री चाचण्या सुरू झाल्या असून लवकरच पाचवी पाणबुडी भारतीय नौदलात सामील होणार आहे.

‘प्रोजेक्ट ७५’च्या पाचव्या पाणबुडीच्या समुद्री चाचण्या सुरू झाल्या आहेत. या अंतर्गत प्रोपल्शन सिस्टीम, शस्त्रे आणि संवेदी उपकरणांची चाचणी घेतली जाणार असल्याचे, भारतीय नौदलाने सांगितले आहे. तसेच अधिकृत निवेदनानुसार, या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर या वर्षाच्या अखेरीस भारतीय नौदलात पाणबुडी सामील करण्यात येणार आहे. नौदलाच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर ही पाणबुडी ‘आयएनएस वागीर’ या नावाने ओळखली जाणार आहे.

नौदलाने निवेदनात म्हटले आहे की, पाणबुडीला समुद्रातील तीच्या सर्व यंत्रणा जसे की प्रणोदन प्रणाली, शस्त्रे आणि संवेदना उपकरणांची सखोल तपासणी केली जाईल. या चाचण्या पूर्ण झाल्यावर २०२२मध्ये ही पाणबुडी भारतीय नौदलाला पुरवण्याची योजना आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number