IPL 2026: IPL सामन्यादरम्यान मोठा वाद, RCB च्या खेळाडूने ठोठावला न्यायालयाचा दरवाजा; काय आहे नेमकं प्रकरण? वाचा

आरसीबीचा श्रीलंकन वेगवान गोलंदाज नुवान थुशारा याने श्रीलंका क्रिकेट बोर्डाविरुद्ध (SLC) चक्क न्यायालयात धाव घेतली आहे.

IPL 2026: IPL सामन्यादरम्यान मोठा वाद, RCB च्या खेळाडूने ठोठावला न्यायालयाचा दरवाजा; काय आहे नेमकं प्रकरण? वाचा

IPL 2026: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2026) 19 व्या हंगामाला दणक्यात सुरुवात झाली आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) पहिल्याच सामन्यात विजय मिळवून आपला दबदबा निर्माण केला असला तरी, संघाबाहेर एका मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. आरसीबीचा श्रीलंकन वेगवान गोलंदाज नुवान थुशारा याने श्रीलंका क्रिकेट बोर्डाविरुद्ध (SLC) चक्क न्यायालयात धाव घेतली आहे. 'ना हरकत प्रमाणपत्र' (NOC) नाकारल्यामुळे थुशाराला अद्याप आरसीबी संघात सामील होता आलेले नाही.

फिटनेस चाचणीवरून श्रीलंका बोर्डाशी संघर्ष
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने नुवान थुशाराचे 'एनओसी' रोखून धरले असून, तो अनिवार्य फिटनेस चाचणीत अपयशी ठरल्याचे कारण दिले आहे. बोर्डाच्या नियमानुसार, राष्ट्रीय संघात निवडीसाठी फिटनेस निकष पूर्ण करणे बंधनकारक आहे. मात्र, 31 वर्षीय थुशाराने या निर्णयाला कोलंबो जिल्हा न्यायालयात आव्हान दिले आहे. थुशाराचा असा युक्तिवाद आहे की, बोर्डासोबतचा त्याचा करार 31 मार्च रोजी संपला असून त्याला तो वाढवायचा नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 9 एप्रिल रोजी होणार आहे.

निवृत्तीचा इरादा आणि थुशाराचा दावा
नुवान थुशाराने न्यायालयात दावा केला आहे की, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या आपल्या निर्णयाबद्दल बोर्डाला आधीच कळवले आहे. "यापूर्वी माझी फिटनेस पातळी अशीच असतानाही बोर्डाने मला खेळण्याची परवानगी दिली होती, मग आताच एनओसी का रोखली?" असा सवाल त्याने उपस्थित केला आहे. बोर्डाचा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत न्यायालयाने यात हस्तक्षेप करून एनओसी देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्याने याचिकेद्वारे केली आहे.

हेही वाचा – LSG vs DC : पहिलाच सामना हातातून गेला! संजीव गोयंका यांनी ऋषभ पंतला झापलं; मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल

आरसीबीसाठी 1.6 कोटींचा फटका
आयपीएल 2025 च्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने नुवान थुशाराला 1.6 कोटी रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले होते. थुशाराने आतापर्यंत आयपीएलमध्ये 8 सामने खेळले असून 9 बळी घेतले आहेत. 2024 मध्ये तो मुंबई इंडियन्सचा भाग होता. आरसीबीला या हंगामात त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र कायदेशीर पेचामुळे तो सध्या मैदानाबाहेर आहे. या वादाचा निकाल काय लागतो, याकडे आता क्रीडा विश्वाचे लक्ष लागले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number