Jasprit Bumrah : टीम इंडियाला बसणार मोठा धक्का? वनडे वर्ल्डकप 2027 नंतर जसप्रीत बुमराहच्या भवितव्याबाबत मोठे संकेत

16 जुलै रोजी कार्डिफ येथे इंग्लंडविरुद्ध झालेला दुसरा वनडे सामना हा बुमराहचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला होता, तिथे क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली होती.

Jasprit Bumrah : टीम इंडियाला बसणार मोठा धक्का? वनडे वर्ल्डकप 2027 नंतर जसप्रीत बुमराहच्या भवितव्याबाबत मोठे संकेत

Jasprit Bumrah Injury Update: भारतीय संघाचा सर्वात महत्त्वाचा वेगवान गोलंदाज आणि प्रमुख मॅच-विनर अस्त्र मानला जाणारा जसप्रीत बुमराह सध्या पुन्हा एकदा दुखापतीच्या समस्येने त्रस्त आहे. श्रीलंका कसोटी मालिकेसाठी त्याची संघात प्राथमिक निवड करण्यात आली होती, परंतु पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे त्याला या मालिकेतून अखेर माघार घ्यावी लागली. बीसीसीआयने (BCCI) त्याच्याऐवजी संघात आकिब नबीचा समावेश केला आहे. 16 जुलै रोजी कार्डिफ येथे इंग्लंडविरुद्ध झालेला दुसरा वनडे सामना हा बुमराहचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला होता, तिथे क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो लॉर्ड्स वनडे मालिकेला मुकला असून तेव्हापासून त्याने एकही चेंडू टाकलेला नाही.  

वनडे वर्ल्डकप 2027 नंतर केवळ T20 मध्ये दिसण्याची शक्यता
सतत भेडसावणाऱ्या दुखापतींमुळे जसप्रीत बुमराहला मोठ्या फॉरमॅटमध्ये दीर्घकाळ गोलंदाजी करणे कठीण जात आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) बुमराहचा वर्कलोड टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु मोठ्या फॉरमॅटसाठी त्याची पूर्ण तयारी झालेली नाही. त्यामुळे आगामी वनडे वर्ल्डकप 2027 संपल्यानंतर बुमराह कसोटी आणि एकदिवसीय फॉरमॅट सोडून केवळ T20 सामन्यांमध्येच खेळताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको. भारतीय संघ व्यवस्थापनाला आतापासूनच बुमराहच्या अनुपस्थितीत मोठ्या फॉरमॅटमध्ये खेळण्याची सवय लावून घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा – Sourav Ganguly : सौरव गांगुली आणि पत्नी डोना कोणाच्या हिटलिस्टवर? महिनाभरापासून येत आहेत जीवे मारण्याच्या धमक्या; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

घाईघाईत पुनरागमन टाळण्यावर CoE चा भर
बीसीसीआयचे सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) बुमराहच्या पुनरागमनाबाबत अत्यंत सावधगिरी बाळगत असून कोणतीही घाई केली जात नाहीये. दीर्घ काळापासून मोठ्या फॉरमॅटमध्ये प्रदीर्घ गोलंदाजी न केल्यामुळे त्याला मैदानात उतरवण्यापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त करणे हेच CoE चे प्राथमिक उद्दिष्ट आहे. घाईघाईत संघात पुनरागमन केल्यास दुखापत अधिक गंभीर रूप धारण करू शकते, या भीतीपोटी त्याला वैद्यकीय देखरेखीत पुरेसा वेळ दिला जात आहे. त्यामुळे तो नक्की कधी पूर्णपणे तंदुरुस्त होऊन आंतरराष्ट्रीय मैदानात परतेल, याबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे.  

आकाश दीपच्या फिटनेसबाबतही सस्पेंस कायम
दुसरीकडे, भारताचा आणखी एक वेगवान गोलंदाज आकाश दीप हा देखील गेल्या 6 महिन्यांपासून क्रिकेटच्या एकाही फॉरमॅटमध्ये खेळू शकलेला नाही. पाठदुखीच्या गंभीर त्रासामुळे तो IPL 2026 स्पर्धा आणि त्यानंतरच्या द्विपक्षीय मालिकांना मुकला होता. फेब्रुवारीमध्ये रणजी ट्रॉफीमध्ये खेळल्यानंतर तो मैदानावर दिसलेला नाही. CoE ने आकाश दीपला पूर्ण तंदुरुस्त करण्यासाठी बरेच प्रयत्न केले, परंतु तोही श्रीलंका कसोटी मालिकेसाठी वेळेत फिट होऊ शकला नाही. आता आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तो तंदुरुस्त होतो की नाही, हा नवा प्रश्न निवड समितीसमोर उभा आहे.

हेही वाचा – T20 Series : भारत-अफगाणिस्तान T20I मालिकेचे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून दिल्लीत रंगणार सामने

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number