IND vs PAK : रायझिंग स्टार्स आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानची टक्कर; जितेश शर्माच्या नेतृत्वात टीम सज्ज

Asia Cup Rising Stars स्पर्धेला सुरुवात झाली असून 16 नोव्हेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान हाय वोल्टेज सामना रंगणार आहे. भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व जितेश शर्मा करेल.

IND vs PAK : रायझिंग स्टार्स आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानची टक्कर; जितेश शर्माच्या नेतृत्वात टीम सज्ज

भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. भारत विरुद्ध पकिस्तान चा आणखी एक हाय व्होल्टेज सामना लवकरच रंगणार आहे. Asia Cup Rising Stars स्पर्धेला आजपासून सुरुवात होत असून, अवघ्या दोन दिवसांनंतर म्हणजेच 16 नोव्हेंबरला भारत – पाकिस्तान सामना रंगणार असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता चांगलीच वाढली आहे.

भारत ‘अ’ संघाची घोषणा

या विशेष स्पर्धेसाठी भारताचा ‘अ’ संघ जाहीर करण्यात आला असून जितेश शर्मा कर्णधार, तर नमन धीर उपकर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व सांभाळतील. या दोघांचे नेतृत्व आणि तूफान खेळी स्पर्धेची खरी शोभा वाढवणारी ठरणार आहे. प्रियांश आर्य आणि वैभव सूर्यवंशी या तरुण जोडीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. दोघांच्या सलामीची धडाकेबाज शैली प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघांसाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. विशेषत: वैभव सूर्यवंशीची आक्रमक फलंदाजी मैदानात रंगत आणणार हे नक्की.

हेही वाचा: Delhi Terror Blast Case : कार ब्लास्टने दिल्ली हादरवणाऱ्या डॉक्टरचं घर अखेर जमीनदोस्त; पण त्याची ओळख कशी पटली?

भारताचे सामने

भारताचा ‘अ’ संघ 14 नोव्हेंबरला पहिल्या सामन्यात युएईचा सामना करेल. त्यानंतर 16 नोव्हेंबरची मोठी लढत भारत विरुद्ध पाकिस्तान. हा सामना रात्री आठ वाजता पाहता येणार असून त्या क्षणांची चाहत्यांना आतुरता आहे. स्पर्धेत भारताचा तिसरा सामना 18 नोव्हेंबरला ओमानशी होईल. त्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी दोन्ही उपांत्य सामने होतील, आणि 23 नोव्हेंबरला अंतिम लढतीत पात्र संघ विजेतेपदासाठी भिडतील. भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांनी गटातून पुढे वाटचाल केली तर अंतिम टप्प्यात पुन्हा एकदा दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांची टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

भारताचा Asia Cup Rising Stars संघ

प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, नेहल वढेरा, नमन धीर (उपकर्णधार), सूर्यांश शेडगे, जितेश शर्मा (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रमणदीप सिंग, हर्ष दुबे, आशुतोष शर्मा, यश ठाकूर, विजय कुमार सिंह, युपन सिंह, युवराज कुमार, विजयराज सिंह, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), सुयश शर्मा.

गुरनूर सिंग ब्रार, कुमार कुशाग्रा, तनुष कोटियन, शेख रशीद, समीर रिझवी ही राखीव खेळाडू आहेत. 

हेही वाचा: Civic Body Election 2025 : शिवसेना निवडणूक प्रभारींची घोषणा; फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची मोर्चेबांधणी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number