India vs Wales Hockey : स्वातंत्र्यदिनी देशाला खास भेट; हॉकी विश्वचषकात वेल्सचा धुव्वा उडवत पहिल्याच सामन्यात भारताची विजयी सुरूवात

कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर भारताने या स्पर्धेत आपल्या मोहिमेचा दमदार प्रारंभ केला आहे.

India vs Wales Hockey : स्वातंत्र्यदिनी देशाला खास भेट; हॉकी विश्वचषकात वेल्सचा धुव्वा उडवत पहिल्याच सामन्यात भारताची विजयी सुरूवात

India vs Wales Hockey : स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहूर्तावर भारतीय पुरुष हॉकी संघाने देशभरातील क्रीडाप्रेमींना विजयाची अनोखी भेट दिली आहे. नेदरलँड्समधील ॲमस्टेलवीन येथील ऐतिहासिक वागेनर हॉकी स्टेडियमवर पार पडलेल्या हॉकी विश्वचषक 2026 च्या आपल्या पहिल्याच सामन्यात भारताने वेल्सचा 3-1 असा पराभव केला. कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर भारताने या स्पर्धेत आपल्या मोहिमेचा दमदार प्रारंभ केला आहे. सामन्यात भारताकडून हरमनप्रीत सिंगने 2, तर संजय रानाने 1 गोल नोंदवला.

पहिल्या सत्रात भारताचा तडाखा: पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल

सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी आक्रमक चढाया करत वेल्सच्या बचावफळीवर प्रचंड दबाव निर्माण केला. पहिल्या सत्रातील 8 व्या मिनिटाला भारताला मिळालेल्या पहिल्या पेनल्टी कॉर्नरचा पुरेपूर फायदा उठवत 25 वर्षीय युवा खेळाडू संजय रानाने चेंडूला गोलपोस्टची दिशा दाखवली. कारकिर्दीतील पहिलाच विश्वचषक खेळणाऱ्या संजयचा हा पहिला आंतरराष्ट्रीय विश्वचषक गोल ठरला. यानंतर 11 व्या मिनिटाला भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्यावर कर्णधार हरमनप्रीत सिंगने जोरदार ड्रॅग-फ्लिक करत वेल्सच्या गोलकीपरला चकवले आणि भारताची आघाडी 2-0 अशी मजबूत केली. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्यामुळे हाफटाइमपर्यंत भारत 2-0 ने पुढे होता.

हरमनप्रीतचे वर्चस्व आणि वेल्सचा एकमेव प्रत्युत्तर गोल

सामन्याच्या तिसऱ्या सत्रात 42 व्या मिनिटाला भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर हरमनप्रीतने पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलमध्ये केले. गोलकीपरच्या डाव्या बाजूने चेंडू नेटमध्ये ढकलत त्याने सामन्यातील वैयक्तिक 2 रा आणि विश्वचषकाच्या इतिहासातील स्वतःचा 8 वा गोल पूर्ण केला. हरमनप्रीतचा हा दुसरा विश्वचषक असून तो या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दरम्यान, सामन्याच्या शेवटच्या सत्रात 55 व्या मिनिटाला वेल्सच्या सॅम वेल्शने गोल करत आपल्या संघाचे खाते उघडले. व्हिडिओ रिव्ह्यूच्या तपासणीनंतर पंचांनी हा गोल मान्य केला.

हेही वाचा – IND vs SL : राहुल-जैस्वालमध्ये गोंधळ! गोलंदाजाने चेंडू टाकताच KL राहुल सुसाट धावला जैस्वाल रनआउट झाला; मैदानावर नेमकं झालं काय?

पुढील लढत 17 ऑगस्ट रोजी इंग्लंडविरुद्ध

वेल्सविरुद्ध मिळालेल्या या दणकेबाज विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. साखळी सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडिया आपला पुढील सामना 17 ऑगस्ट रोजी बलाढ्य इंग्लंड संघाविरुद्ध खेळणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत स्थान भक्कम करण्यासाठी भारतीय संघासाठी हा पुढील सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number