सध्या मुल्लानपूर येथे सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारताच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 51 धावांनी भारतावर विजय मिळवला. क्विंटन डी कॉकने 46 चेंडूत 90 धावा केल्या, ज्यात सात षटकार आणि पाच चौकारांचा समावेश होता. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला 19.1 ओव्हरमध्ये 162 रन्सवर ऑलआऊट केलं.
गुरुवार, 11 डिसेंबर रोजी चंदीगडच्या नवीन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात, टीम इंडियाने प्रथम दक्षिण आफ्रिकेला 213 धावांचा मोठा खेळ करण्याची परवानगी दिली. प्रत्युत्तरात, तिलक वर्मा वगळता संपूर्ण संघ फलंदाजीत अपयशी ठरला. परिणामी, दक्षिण आफ्रिकेने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आणि पहिल्या पराभवाची अचूक परतफेड केली. आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला अवघे 8 सामने बाकी असताना टीम इंडियाला पहिला सामना जिंकल्यानंतर दुसरा सामना गमवावा लागला.
दरम्यान यंदा टीम इंडियातील दोन स्टार फलंदाजांनी त्यांचा फॉर्म वाईटरित्या अपयशी ठरवला. या वर्षी, टीम इंडियाचा कर्णधार आणि उपकर्णधार यांनी एकही अर्धशतक झळकावलेले नाही. मालिकेच्या पहिल्या सामन्यात, शुभमन गिलने अवघ्या 4 धावा काढल्या तर दुसरीकडे सूर्यकुमार यादवने केवळ 12 धावा काढल्या. त्यातच दुसऱ्या सामन्यात गिल पहिल्याच चेंडूवर बाद झाला, तर सूर्याने फक्त 5 धावा केल्या. ज्यामुळे चाहत्यांमध्ये निराशा व्यक्त केली जात असून कर्णधार सूर्यकुमार आणि उपकर्णधार शुभमन गिल यांच्या अपयशांबद्दल सर्वाधिक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
यावेळी सूर्यकुमार यादवने आपल्या चुका मान्य करत गिलने धावा काढण्याची जबाबदारी घ्यायला हवी होती असं विधन देखील केल. यावेळी सूर्यकुमार यादव म्हणाला की, "मी आणि गिलने चांगली सुरुवात करायला हवी होती. आपण नेहमीच अभिषेकवर अवलंबून राहू शकत नाही. मला जास्त लांब खेळी खेळायला हवी होती. आपण यातून शिकू आणि पुढच्या सामन्यात चांगले करू. "