Yashasvi Jaiswal: क्रिकेटच्या मैदानावर हायव्होल्टेज ड्रामा! असिथा फर्नांडोशी नडला यशस्वी जैस्वाल; नेमकं काय घडलं?

दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दिक बाचाबाची इतकी वाढली की ते एकमेकांच्या अगदी जवळ आले आणि त्यांच्यात हेल्मेटचा थेट संपर्क झाला.

Yashasvi Jaiswal: क्रिकेटच्या मैदानावर हायव्होल्टेज ड्रामा! असिथा फर्नांडोशी नडला यशस्वी जैस्वाल; नेमकं काय घडलं?

Yashasvi Jaiswal: कोलंबो येथे खेळल्या जात असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान पहिल्याच दिवशी मैदानावर कमालीचा तणाव पाहायला मिळाला. भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो यांच्यात थेट मैदानावरच वाद झाला. यशस्वी 45 धावांवर बाद होऊन माघारी परतत असताना ही घटना घडली. दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दिक बाचाबाची इतकी वाढली की ते एकमेकांच्या अगदी जवळ आले आणि त्यांच्यात हेल्मेटचा थेट संपर्क झाला. इतर खेळाडूंनी त्वरित मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली, मात्र या घटनेमुळे आता आयसीसीच्या शिस्तभंगाच्या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.

नेमकं मैदानावर काय घडलं?

भारताच्या डावातील 17 व्या षटकातील अंतिम चेंडूवर फर्नांडोने यशस्वीला त्रिफळाचित केले. 45 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाल्यानंतर यशस्वी तंबूकडे परतत असताना फर्नांडोने त्याला चिडवणारी टिप्पणी केली. यावर यशस्वीचा संयम सुटला आणि तो माघारी फिरून गोलंदाजाच्या दिशेने गेला. नॉन-स्ट्रायकर एंडवरील देवदत्त पडिक्कलने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन्ही खेळाडू आमनेसामने आले. याच दरम्यान दोघांचे डोके एकमेकांना भिडल्याने वाद अधिक पेटला. अखेर श्रीलंकेचे खेळाडू आणि मैदानातील पंचांनी दोन्ही खेळाडूंना बाजूला केले.

हेही वाचा – Mitchell Starc AUS vs BAN 2nd Test : W,W,W,W,W,W… मिलेच स्टार्कची आग ओकणारी बॉलिंग अन् बांगलादेश उद्ध्वस्त; 22 चेंडू संपूर्ण संघाला बॅकफूटवर टाकलं

आयसीसीच्या नियमांनुसार शिक्षेची शक्यता

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) आचारसंहितेनुसार मैदानावर प्रतिस्पर्धी खेळाडूशी शारीरिक संपर्क साधणे किंवा आक्रमक गैरवर्तन करणे हा गंभीर अपराध मानला जातो. हे प्रकरण जर आयसीसीच्या ‘लेव्हल-4’ उल्लंघनाच्या श्रेणीत धरले गेले, तर दोषी खेळाडूवर आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून बंदीची कारवाई होऊ शकते. या श्रेणीत 5 कसोटी किंवा 10 एकदिवसीय सामन्यांच्या निलंबनाची तरतूद आहे. मात्र, सामनाधिकाऱ्यांचा अधिकृत अहवाल आणि सुनावणीनंतरच यावर अंतिम निर्णय होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number