पंकजा मुंडेंविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे […]

पंकजा मुंडेंविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे धनंजय मुंडेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

धनंजय मुंडे यांनी केज मतदारसंघातील प्रचारसभेदरम्यान पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. ही सभा दोन दिवसांपूर्वी पार पडली होती. या सभेनंतर याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यामुळे परळीतील वातावरण चांगलेच तापले होते.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आज पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच आज शेकडो कार्यकर्ते परळी पोलिस ठाण्याकडे रवाना झाले. यावेळी धनंजय मुंडेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नुकतंच परळी शहर पोलीस ठाण्यात कलम 500, 509, 294 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number