‘महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेल’

राज्यात महाविकास आघाडीमधील नेते सरकार पाच वर्ष टिकेल असा विश्वास व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सरकार पडणार असल्याचं खळबळजनक वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेल असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. ‘तुम्ही सरकार कधी पडणार असं विचारत आहात तर मी सांगतो की, असेच सगळे झोपेत असताना सरकार जाईल. कळणारच नाही […]

‘महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेल’

राज्यात महाविकास आघाडीमधील नेते सरकार पाच वर्ष टिकेल असा विश्वास व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सरकार पडणार असल्याचं खळबळजनक वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेल असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

‘तुम्ही सरकार कधी पडणार असं विचारत आहात तर मी सांगतो की, असेच सगळे झोपेत असताना सरकार जाईल. कळणारच नाही कधी गेलं’. असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावरदेखील भूमिका मांडली. ‘मराठा समाजाने आज रस्त्यावर उतरुन संघर्ष नाही केला, तर वेळ निघून जाईल. त्यामुळे कोणताही झेंडा, बॅच न घेऊन भाजपा आंदोलनात सहभागी होणार आहे,’, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.’भाजपानं पक्ष म्हणून किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाही आहेत. त्यांचा केलेला सन्मान आणि किती कामे मार्गी लावली हे कदाचित इतरांना माहित नाही’, असं ते म्हणाले.

‘संभाजीराजेंनी चार वेळा भेट मागण्याच्या आधी ४० वेळा मोदींजीसोबत त्यांची भेट झाली आहे. राजे भेट मागतात मोदीजी भेट द्यायचे. कोविड पराकोटीला गेला आहे आणि ज्यासाठी ते भेट मागत आहे, तो विषय केंद्राचा नसून राज्याचा आहे’, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number