WPL Auction 2026: WPL लिलावाबाबत BCCI ची मोठी घोषणा; ‘या’ तारखेला कोचीमध्ये होणार खेळाडूंचा लिलाव

WPL च्या नियमांनुसार एका संघात जास्तीत जास्त 18 खेळाडू असू शकतात, ज्यामध्ये 6 परदेशी खेळाडूंचा समावेश करण्याची मुभा आहे.

WPL Auction 2026: WPL लिलावाबाबत BCCI ची मोठी घोषणा; ‘या’ तारखेला कोचीमध्ये होणार खेळाडूंचा लिलाव

WPL Auction 2026: महिला प्रीमियर लीगच्या (WPL) आगामी हंगामासाठीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. बीसीसीआयने (BCCI) WPL मधील सर्व 5 फ्रँचायझींना आगामी हंगामाच्या लिलावाची तारीख आणि ठिकाण याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे. त्यानुसार, खेळाडूंचा बहुप्रतिक्षित लिलाव 28 ऑक्टोबर रोजी कोची येथे पार पडणार आहे. फ्रँचायझींकडे आपल्या संघात बदल करण्यासाठी आता मर्यादित वेळ उरला असून, कोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवायचे (Retention) आणि कोणाला मुक्त करायचे, याचा अंतिम निर्णय घेण्याची मुदत 28 सप्टेंबरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

15 कोटी रुपयांची ‘सॅलरी कॅप’; फ्रँचायझींसमोर रणनीतीचे आव्हान

WPL च्या नियमांनुसार एका संघात जास्तीत जास्त 18 खेळाडू असू शकतात, ज्यामध्ये 6 परदेशी खेळाडूंचा समावेश करण्याची मुभा आहे. सध्याच्या सायकलसाठी सर्व फ्रँचायझींची ‘सॅलरी कॅप’ (वेतनाची कमाल मर्यादा) 15 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. या मर्यादित बजेटमध्ये सर्वोत्तम संघ तयार करण्यासाठी लिलावापूर्वी कोणत्या खेळाडूंना कायम ठेवायचे आणि कोणाला रिलीज करायचे, यावर सर्व 5 फ्रँचायझींना कसरत करावी लागणार आहे. आगामी हंगामाचे सामने जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत आयोजित केले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Asia Cup 2026: भारतीय क्रिकेट पुरुष संघासह महिला संघाची देखील पुनरावृत्ती, सामना जिंकूनही विजेतेपद स्वीकारण्यास मनाई!

मुंबई आणि वडोदरा मुख्य ठिकाणे 

आगामी WPL हंगामाचे सामने मुंबईतील सीसीआय (CCI) आणि वडोदरा येथील कोतांबी स्टेडियमवर खेळवले जाण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी चौथ्या हंगामातील सामनेही याच दोन ठिकाणी पार पडले होते आणि अंतिम सामना 5 फेब्रूवारी रोजी वडोदरा येथे झाला होता. वाराणसी येथे नवीन स्टेडियमचे बांधकाम सुरू असल्याने तेथे काही सामने आयोजित करण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावरील एवढ्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करण्यापूर्वी त्या मैदानाची देशांतर्गत सामन्यांद्वारे सज्जता तपासणे गरजेचे असल्याने, यंदा वाराणसीमध्ये सामने होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

विजेत्या ‘आरसीबी’सह सर्व संघांचे लिलावाकडे लक्ष

सध्या ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ (RCB) हा WPL चा विजेता संघ आहे. बीसीसीआयने लिलावाची तारीख जाहीर केल्यानंतर आता सर्वच फ्रँचायझींनी 28 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या लिलावासाठी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. आगामी हंगामात विजेतेपदावर नाव कोरण्यासाठी आणि आपला संघ अधिक मजबूत करण्यासाठी सर्व फ्रँचायझी कोची येथील लिलावात बोली लावताना दिसतील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number