Valentine’s Day पूर्वी ‘या’ गेस्ट हाऊसवर पोलिसांची धाड, आणि समोर आलं धक्कादायक वास्तव

‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या तोंडावर चंद्रपूरच्या रेणुका गेस्ट हाऊसमध्ये वेगवेगळ्या खोल्यांमध्ये कॉलेजमधील तब्बल 13 प्रेमी जोडपी पोलीस कारवाईत पकडली गेली. या सर्व जोडप्यांना रामनगर पोलीस स्थानकात आणलं गेलं तसंच गेस्टा हाऊसचा मालक आणि त्याच्या साथीदारालाही ताब्यात घेण्यात आलंय. काय घडलं नेमकं? नागपूर महामार्गावरील जनता चौक इथल्या रेणुका गेस्ट हाऊसमध्ये काही गैरप्रकार सुरु असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. […]

Valentine’s Day पूर्वी ‘या’ गेस्ट हाऊसवर पोलिसांची धाड, आणि समोर आलं धक्कादायक वास्तव

‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या तोंडावर चंद्रपूरच्या रेणुका गेस्ट हाऊसमध्ये वेगवेगळ्या खोल्यांमध्ये कॉलेजमधील तब्बल 13 प्रेमी जोडपी पोलीस कारवाईत पकडली गेली. या सर्व जोडप्यांना रामनगर पोलीस स्थानकात आणलं गेलं तसंच गेस्टा हाऊसचा मालक आणि त्याच्या साथीदारालाही ताब्यात घेण्यात आलंय.

काय घडलं नेमकं?

नागपूर महामार्गावरील जनता चौक इथल्या रेणुका गेस्ट हाऊसमध्ये काही गैरप्रकार सुरु असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली.

स्थानिक पोलिसांनी तात्काळ धडक कारवाई केली.

तेव्हा रेणुका गेस्ट हाऊसच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये 13 महाविद्यालयीन जोडपी आढळून आली.

गेस्ट हाऊसचा परिसर हा चंद्रपूर शहरातील शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाचा परिसर मानला जातो.

त्यामुळे येथे शिकण्यासाठी येणाऱ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे (college boys and girls) हे प्रकार समोर आल्यावर पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

असं जरी असलं, तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सज्ञान व्यक्ती जर स्वमर्जीने कुणासोबत हॉटेल किंवा गेस्ट हाऊससारख्या ठिकाणी सापडली तर तो गुन्हा ठरू शकत नाही. मात्र पकडल्या गेलेल्या कॉलेज जोडप्यांपैकी कोण कायदेशीरदृष्ट्या सज्ञान आहे, हे पोलिसांनी जाहीर करण्यास नकार दिलाय. पुढील तपास आणि चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. या गेस्ट हाऊसच्या खोल्या कुठल्याही व्यक्तीच्या माहितीची शहानिशा न करता, रेकॉर्डविना प्रती तास तत्वावर जोडप्यांना दिल्या जात होत्या. याबद्दल मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number