Gunaratna Sadavarte On Eknath Shine: "एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही" सदावर्तेंचा मोठा दावा; राजकीय वातावरण तापलं

सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलेलं आहे. अशातच गुणरत्न सदावर्ते यांनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नसल्याचा दावा केला आहे.

Gunaratna Sadavarte On Eknath Shine: &quotएकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही&quot सदावर्तेंचा मोठा दावा; राजकीय वातावरण तापलं

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करत असताना एकनाथ शिंदेंबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलेलं आहे. अशातच गुणरत्न सदावर्ते यांनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नसल्याचा दावा केला आहे.

जरांगे यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर आणि त्यांच्या मागण्यांवर सवाल उपस्थित करत सदावर्ते यांनी सरकार, राजकारण आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून, सदावर्ते यांच्या दाव्यांवर आता विरोधक आणि संबंधित नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा- Sanjay Raut : “2029 च्या आधीच मोदी..” राऊतांच्या दाव्याने राजकीय वर्तूळात खळबळ; केंद्रात आणि राज्यात काय घडणार?

गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, “मला वाटतं आता दुसरी संधी एकनाथ शिंदेंना मिळणार नाही. ‘सीन चला तो पब्लिक बडा पब्लिक बडा तो सोच बडी सोच बडी तो राजनिती बडी’ असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची टीम हे सगळ करू शकतात आणि ते करतायत. एकनाथ शिंदेंच राजकारण मला असं दिसतंय, प्रेमात आणि राजकारणात सर्वकाही माफ आहे. प्रेम आणि युद्धासाठी हे वाक्य होत ते एकनाथ शिंदेंनी राजकारणाशी बदलून टाकलं आहे.”

“प्रत्येकाला एक संधी मिळते, पण गरजेच नाही की ती संधी सारखी सारखी मिळेल. प्रत्येकाला वाटतं आपल्याला दुसरी संधी मिळावी, मानीवृत्ती आहे, पण मला असं वाटतं आजच्या स्टेबल पॉलिटिक्समध्ये एकनाथ शिंदेंनी कितीही क्लायमेक्स बदलायचा प्रयत्न केला, किंवा आणखी एखादा मन्या (मनोज जरांगे पाटील) आणून बसवला कार्यक्रम सुरु करण्यासाठी तरी सुद्धा मुख्यमंत्री होण्याची दुसरी संधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नाही.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number